शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

सावली नको म्हणून ३६ झाडांवर कुहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:20 IST

झाडांमुळे सावली पडते आणि हीच सावली सौरऊर्जा प्रकल्पासाठी नको असते म्हणून तालुक्यातील वावी येथील वीज वितरण कंपनीच्या प्रांगणातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३६ झाडांवर कुºहाड चालविण्यात आली आहे. वावी येथे साकारत असलेला सौरऊर्जा प्रकल्प स्वागतार्ह असला तरी त्यासाठी कत्तल करण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात नवीन झाडे आणि ती केव्हा लावली जाणार आहेत

सिन्नर : झाडांमुळे सावली पडते आणि हीच सावली सौरऊर्जा प्रकल्पासाठी नको असते म्हणून तालुक्यातील वावी येथील वीज वितरण कंपनीच्या प्रांगणातील एक दोन नव्हे, तर तब्बल ३६ झाडांवर कुºहाड चालविण्यात आली आहे.वावी येथे साकारत असलेला सौरऊर्जा प्रकल्प स्वागतार्ह असला तरी त्यासाठी कत्तल करण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात नवीन झाडे आणि ती केव्हा लावली जाणार आहेत याबाबत कोणताही अधिकारी ठामपणे सांगण्यास पुढे येत नसल्याचे दिसते.  वावी गावालगतच पश्चिमेला नांदूरशिंगोटे रस्त्यावर वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र आहे. स्वमालकीची भव्य आणि प्रशस्त जागा असल्याने वीज वितरण कंपनीकडून याठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीला पाणी देण्याच्या रब्बीच्या काळात विजेचा तुटवडा निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर कृषी रोहित्रांना वीज पुरविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने सौरऊर्जा प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या नक्कीच हिताचा आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथील वीज वितरण कंपनीची सपाट आणि प्रशस्त जागा निवडण्यात आली आहे. सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून, त्यासाठी लागणारे पॅनल प्रकल्पाच्या जागेवर आले आहेत. मैदान सपाटीकरणाचे काम पूर्ण करतानाच या भागात असणारी विविध ३६ झाडे तोडण्यात आली आहेत. या सौरऊर्जा प्रकल्पासाठी सावली नको असते, त्यामुळे ही झाडे तोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या बदल्यात किती झाडे लावण्यात येणार आहेत आणि केव्हा याबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी ठामपणे काहीही सांगत नाहीत. ‘आम्हाला या प्रकल्पाची माहिती देण्यास परवानगी नाही, तुम्ही वरिष्ठांसोबत बोला’, असे मोघम उत्तर वावीचे सहायक अभियंता अजय सावळे यांनी दिले. वावीचे छोटेसे पर्यटनस्थळच ओसाडवावी गावापासून पश्चिमेला असलेल्या वीज वितरण कंपनीच्या प्रांगणात दत्त मंदिर आहे. याठिकाणी दर्शनासाठी आणि सायंकाळी फिरण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांसह महिला व ग्रामस्थ जात असतात. पायी फिरण्यासाठी जाऊन अनेकजण या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. मुले खेळतात. या मंदिरासमोर छोटासा बगीचा तयार करण्यात आला होता, याशिवाय पाण्याचा कारंजाही होता. याठिकाणी ग्रामस्थ व तत्कालीन कर्मचाºयांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात झाडे होती. कर्मचारी वसाहतही जवळच असल्याने झाडांची काळजी राखली जात होती. मात्र सौरऊर्जा प्रकल्पासाठी या झाडांवर कुºहाड चालविण्यात आल्याने वावीकरांचे छोटेसे पर्यटनस्थळ ओस पडण्याच्या मार्गावर आहे.असा आहे सौरऊर्जा प्रकल्प..सिन्नरच्या पूर्व भागातील वावी येथे सुमारे ६० हजार स्क्वेअर फूट जागेवर सौरऊर्जा प्रकल्प साकारला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त उपक्रमातून सदर प्रकल्प होणार आहे. शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करता यावा हा त्यामागील उद्देश आहे. ५१० किलोवॉट म्हणजे ०.५ मेगावॉट क्षमतेचा सदर सौरऊर्जा प्रकल्प आहे. सी.एल. इंडिया लिमिटेड (सेंट्रल इलेक्ट्रॉनिक इंडिया) कंपनीकडून सदर काम केले जात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १६२० पॅनल असणार आहेत. सुमारे दोन ते तीन महिन्यांत या प्रकल्पाचे काम होईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :environmentवातावरण