शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोषागार कार्यालयात ३५० कोटींची देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:42 IST

आर्थिक वर्षाअखेर शासकीय कार्यालयांचे देणे व अनुदान वाटपाची शुक्रवारअखेर सुमारे दोन हजार देयके जिल्हा लेखाकोष कार्यालयात जमा झाली असून, त्यापोटी ३५० कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा कोषागार कार्यालयाने सुमारे पाचशे कोटी रुपयांची देयके अदा केली आहेत. शनिवारी आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे यांनी सांगितले.

नाशिक : आर्थिक वर्षाअखेर शासकीय कार्यालयांचे देणे व अनुदान वाटपाची शुक्रवारअखेर सुमारे दोन हजार देयके जिल्हा लेखाकोष कार्यालयात जमा झाली असून, त्यापोटी ३५० कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा कोषागार कार्यालयाने सुमारे पाचशे कोटी रुपयांची देयके अदा केली आहेत. शनिवारी आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने रात्री १२ वाजेपर्यंत कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी विलास गांगुर्डे यांनी सांगितले.  दरवर्षाप्रमाणे यंदाही शासनाचे अर्थसंकल्पीय अनुदान वर्षाच्या अखेरच्या दिवशी विविध विभागांकडून अदा करण्यात येते. त्यात शासकीय योजना व अनुदानाचा तसेच कामांच्या देयकांचा संबंध असतो. त्याचप्रमाणे शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय देयके, प्रवास बिले, कार्यालयीन खर्चदेखील आर्थिक वर्षाअखेर अदा केला जात असल्याने कोषागार कार्यालयाच्या कामकाजावर मार्च महिन्यात ताण पडतो. आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्हा कोषागार कार्यालयाकडे २००० देयके सादर करण्यात आली असून, त्यापोटी ३५० कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. शनिवारी (दि. ३१) जिल्हा लेखाकोषागार व उपकोषागार कार्यालये सुरू राहणार असून, जिल्हा कार्यालय रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.५०० कोटी रुपये अदायंदा शासनाने सर्वच खात्यांना पत्र पाठवून कार्यालयीन देयके २३ मार्चपर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात २० मार्चपासून साधारणत: दररोज एक हजार देयके सादर केली जात होती. आलेल्या देयकांची तपासणी व शासनाने केलेली आर्थिक तरतूद तपासून तत्काळ देयके अदा करण्यास सुरुवात करण्यात आली असून, शुक्रवारपर्यंत जवळपास ५०० कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत,

टॅग्स :Governmentसरकार