शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लांडग्यांच्या हल्ल्यात ३५ शेळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 15:23 IST

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात लांडग्यांच्या कळपाने बंदिस्त झापात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यात २४ शेळ्या व ११ बकरांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने पशुपालकावर मोठे संकट ओढावले आहे. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गुळवंच येथील धनराज वाळीबा सानप यांची शेतजमिन एमआयडीसीच्या ...

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात लांडग्यांच्या कळपाने बंदिस्त झापात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यात २४ शेळ्या व ११ बकरांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेने पशुपालकावर मोठे संकट ओढावले आहे. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गुळवंच येथील धनराज वाळीबा सानप यांची शेतजमिन एमआयडीसीच्या प्रकल्पात गेली आहे. त्यानंतर ते पशुपालनाचा व्यवसाय करु लागले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी शेळ्यांची खरेदी केली होती. सानप यांच्याकडे शेतजमिन नसल्याने ते भाऊसाहेब रामनाथ सानप यांची शेतजमिन वाट्याने करण्यासह शेळीपालनाचा व्यवसाय करीत होते. बारागावपिंप्री रस्त्यावर गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीत झापात सानप यांनी रात्रीच्यावेळी शेळ्या कोंडलेल्या होत्या. धनराज सानप शेळ्या झापात कोंडून जवळच बाहेर झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने सानप जागे झाले. यावेळी ६ ते ७ लांडगे झापात शिरले होते. दरवाजा उघडल्याने काही शेळ्या जीवाच्या आकांताने सैरवर पळू लागल्या होत्या. लांडग्यांच्या हल्ल्यामुळे काही शेळ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला तर काही शेळ्या व बकरांचा लांडग्यांनी फडशा पाडला. सानप एकटेच होते, त्यांनी लांडग्यांचा हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र लांडग्यांनी त्यांना जुमानले नाही. सानप घरात गेले व मोबाइलहून परिसरातील शेतकऱ्यांना फोन करुन मदतीसाठी बोलावून घेतले. तोपर्यंत ६ ते ७ लांडग्यांच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी उजेडल्यानंतर परिसरात १४ मृत शेळ्या तर २ अत्यवस्थ शेळ्या आढळून आल्या. इतर शेळ्या व बकरांचा लांडग्यांनी फडशा पाडल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Nashikनाशिक