शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

३३ लढाऊ वैमानिक देशसेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:19 IST

दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडणारा एव्हिएशन विंग प्रदान दीक्षांत सोहळ्याचा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लष्करी थाट कमी स्वरूपात अनुभवयास आला. ...

दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडणारा एव्हिएशन विंग प्रदान दीक्षांत सोहळ्याचा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लष्करी थाट कमी स्वरूपात अनुभवयास आला. यावेळी चित्ता, चेतक, ध्रुवच्या प्रात्यक्षिकेही रद्द करण्यात आली होती, तसेच सैनिकी बॅन्ड पथकाची धूनही यंदा कानी पडली नाही. सकाळी पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील एअरफिल्ड मैदानावर ३३ वैमानिकांच्या तुकडीने सोहळ्याला उपस्थित असलेले जनरल आर्मी एव्हिएशनचे ऑफिशिएटिंग संचालक मेजर जनरल अजयकुमार सुरी यांना ‘सॅल्यूट’ केला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुरी यांनी भूषविले. एका खास आकर्षक बग्गीतून सुरी यांचे एअरफील्ड मैदानावर आगमन झाले. अजयकुमार सुरी हे खास बग्गीतून एअरफील्ड मैदानावर दाखल झाले. दरम्यान, त्यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रशस्तिपत्रक, विंग देऊन, तसेच पाच विजेत्यांना विविध स्मृतिचषक प्रदान करत गौरविण्यात आले.

दरम्यान, युवा लढाऊ वैमानिकांचे अभिनंदन करत, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत सुरी म्हणाले, ज्ञान आणि कौशल्य हे कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी वैमानिकासाठी महत्त्वाचे ठरते. कौशल्याचा जोरावर तंत्रज्ञानाचा अचूक वापर जेव्हा केला जातो, तेव्हा तुम्ही यशाला गवसणी घालतात. युद्धभूमीवर आपली भूमिका फार महत्त्वाची असते. भूदलावरील सैनिकांना अत्यावश्यक रसद पुरविण्यापासून आपत्कालीन रेस्क्यूपर्यंत सर्व कामगिरी एका लढाऊ वैमानिकाला चोखपणे पार पाडावी लागते, असा गुरुमंत्रही सुरी यांनी यावेळी आपल्या संदेशात नववैमानिकांना दिला.

---इन्फो--

...हे वैमानिक ठरले विजेते

तुकडीमधील कॅप्टन संतोषकुमार सोरापल्ली यांनी प्रशिक्षण कालावधीत सर्व श्रेणीत विशेष प्रावीण्य मिळविल्याने त्यांना मानाची ‘सिल्वर चित्ता’ ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले, तसेच कॅप्टन तारीफ सिंग हे उत्कृष्ट उड्डाणाकरिता दिली जाणारी ‘कॅप्टन एस.के.शर्मा’ स्मृतिचषकाचे मानकरी ठरले. कॅप्टन प्रभू देवन यांनी ‘एअर ऑब्जर्वेशन पोस्ट-३५’ट्रॉफी पटकाविली. कॅप्टन सचिन गुलीया यांना फ्लेजिंग ट्रॉफी देऊन सन्मानित केले गेले. कॅप्टन दिवाकर ब्रह्मचारी यांनी उत्कृष्ट गनरचा किताब प्राप्त करत, पी.के.गौर चषकावर आपले नाव कोरले.

---इन्फो--

‘कॅट‌्स’ला ‘प्रेसिडेन्ट कलर्स’चा बहुमान

लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा एकूण १३ महिन्यांचा असतो. ‘कॅट‌्स’ संस्थेची स्थापना १९८६साली करण्यात आली. शिमला येथील आर्मी ट्रेनिंग कमांडच्या (एआरटीआरएसी) अधिपत्याखाली या संस्थेची यशस्वी घोडदौड ३४ वर्षांपासून सुरू आहे. भारतीय सेनेचा पाठीचा कणा म्हणून ही संस्था ओळखली जाते. म्हणूनच या केंद्राला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मागील वर्षी ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ हा बहुमान प्रदान करण्यात आला होता.