शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ३२५ रुग्णालये रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:21 IST

नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करणे आवश्यक असताना, ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून येत्या १ एप्रिलपासून सदर रुग्णालये सील करण्याबाबत होणारी कारवाई अटळ मानली जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या इशाऱ्यानंतर आतापर्यंत २४१ रुग्णालयांची नोंदणी-नूतनीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रांनी दिली आहे.

नाशिक : नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करणे आवश्यक असताना, ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून येत्या १ एप्रिलपासून सदर रुग्णालये सील करण्याबाबत होणारी कारवाई अटळ मानली जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या इशाऱ्यानंतर आतापर्यंत २४१ रुग्णालयांची नोंदणी-नूतनीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रांनी दिली आहे.  शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने नव्याने नियमावली आणली आहे. त्यात प्रामुख्याने नगररचनासह अग्निशमन विभाग, पर्यावरण तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहेत. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसविणे, इमारतींचा मिश्र वापर असल्यास दोन जिन्यांची व्यवस्था करणे, खाटांनुसार वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे आदी नियमांचा त्यात समावेश आहे.  मात्र, या नियमांमधून जुन्या रुग्णालयांना वगळण्यात यावे अथवा त्यांना सवलत देण्यात यावी, वाहनतळाचे नियम शिथिल करावेत तसेच बांधकामे नियमित करण्यासाठी हार्डशिप प्रीमिअम केवळ  नवीन रुग्णालयांसाठी लागू करावा आदी मागण्या आयएमएने महापालिकेकडे मांडल्या होत्या. परंतु, आयुक्तांनी नियमानुसारच कार्यवाही होईल, अन्यथा १ एप्रिलपासून नोंदणी न करणाºया रुग्णालयांवर सील ठोकण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला  होता. त्यानुसार आतापर्यंत शहरातील ५७६ रुग्णालयांपैकी २४१ रुग्णालयांनीच नोंदणी व नूतनीकरणाला प्रतिसाद दिला असून, १० रुग्णालयांचे नूतनीकरणासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. ७० नवीन रुग्णालयांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.  अद्याप ३२५ रुग्णालयांनी नोंदणी व नूतनीकरणासाठी प्रतिसादच दिलेला नाही. त्यामुळे अशी रुग्णालये आता महापालिकेच्या रडारवर असून, १ एप्रिलपासून त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल