शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा महिन्यात स्वाइन फ्लूचे ३२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:27 IST

दमट हवामान व वाऱ्याच्या वेगाने पसरणाºया रोगामुळे जिल्ह्यात गेल्या साडेसहा महिन्यात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले असून, या काळात स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळलेल्या २५० रुग्णांवर  यशस्वी उपचार करून त्यांना वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे.

नाशिक : दमट हवामान व वाऱ्याच्या वेगाने पसरणाºया रोगामुळे जिल्ह्यात गेल्या साडेसहा महिन्यात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले असून, या काळात स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळलेल्या २५० रुग्णांवर  यशस्वी उपचार करूनत्यांना वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. स्वाइन फ्लूने नाशिक ग्रामीण जिल्ह्याबरोबरच नाशिक शहरातही बळी घेतले  आहे. हवेच्या माध्यमातून प्रवाहित होणाºया स्वाइन फ्लूचे यंदाही प्रमाण कायम असून, उन्हाच्या तडाख्यात स्वाइन फ्लूचे विषाणू कमी होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असले तरी, यंदा मात्र उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम राहिला. त्यातच जूनच्या दुसºया आठवड्यापासून हवामानात दमटपणा त्याच बरोबर पावसामुळे उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने जुलैच्या मध्यान्हापर्यंत जिल्ह्णात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले आहेत. एरव्ही शहरी भागापर्यंत मर्यादित असलेल्या स्वाइन फ्लूने ग्रामीण भागालाही विळखा घातल्याने सहा महिन्यांत ६६ रुग्णांचे रक्त नमुने स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह निघाले व त्यातून ११ जणांचा बळी गेला. शहरी भागातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, मनमाड, भगूर व देवळाली या ठिकाणीही सुमारे १८५ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले, त्यातील १५ जणांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची ग्रामीण भागातही वाढती लागण लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात टॉमीफ्लूचा पुरेसा साठा करून ठेवला असून, एक अथवा दोन दिवस उपचार करून रुग्णाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवून तेथेच त्यांचे नमुने घेतले जात आहेत. अशा प्रकारे सुमारे २५० रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे.स्वाइन फ्लूची लागण होऊन २० पुरुष व १२ महिला अशाप्रकारे ३२ जणांचा बळी घेतला गेला असला तरी, साधारणत: वयाच्या ३६ ते ५५ वर्षांच्या व्यक्तींनाच त्याची लागण होऊन बळी गेला आहे. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्यांमध्येही प्रामुख्याने ३६ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचा अधिक समावेश आहे. असाच चढता क्रम ४६ ते ५५ व पुढील वयोगटातील व्यक्तींसाठी आहे.परजिल्ह्यातील रुग्णही नाशकातनाशिक येथे उपचारासाठी येणाºया स्वाइन फ्लू बाधित रुग्णांमध्येनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, पालघर, सोलापूर, नेपाळच्या रहिवाशांचा समावेश आहे. त्यातील सहा रुग्ण उपचारार्थ दगावले.परजिल्ह्यातील  रुग्णही नाशकातनाशिक येथे उपचारासाठी येणाºया स्वाइन फ्लू बाधित रुग्णांमध्ये नगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, परभणी, पालघर, सोलापूर, नेपाळच्या रहिवाशांचा समावेश आहे. त्यातील सहा रुग्ण उपचारात दगावले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूNashikनाशिक