शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आॅक्टोबर महिन्यात स्वाइन फ्लूचे ३२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:17 IST

शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण घटत असले तरी चालू महिन्यात ७८ रुग्ण आढळले आहेत, तर ३२ जणांचा बळी गेला आहे. त्यात ८ जण हे महापालिका हद्दीतील असून उर्वरित २४ मृत हे महापालिका हद्दीबाहेरील असून, त्यात काही अहमदनगर जिल्ह्यातीलदेखील आहेत.

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे प्रमाण घटत असले तरी चालू महिन्यात ७८ रुग्ण आढळले आहेत, तर ३२ जणांचा बळी गेला आहे. त्यात ८ जण हे महापालिका हद्दीतील असून उर्वरित २४ मृत हे महापालिका हद्दीबाहेरील असून, त्यात काही अहमदनगर जिल्ह्यातीलदेखील आहेत. अर्थात, गतमहिन्याच्या तुलनेत डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची संख्या घटत आहे. चालू महिन्यात डेंग्यूचे ९७ रुग्ण आढळले आहे. वातावरण बदलामुळे रुग्ण संख्या घटत असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.  शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यूसह अन्य आजाराने सध्या धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्यापर्यंत दाखल रुग्णांची संख्या वाढत असताना यंदाच्या महिन्यात काही प्रमाणात रुग्ण संख्येत घट झाली आहे. १ ते २६ आॅक्टोबर महिन्यात ७८ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, तर महापालिका हद्दीबाहेरील ९२ रुग्ण असून, एकूण १७० रुग्ण आढळले आहेत त्यातील ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आठ महापालिका हद्दीतील आहेत. गत महिन्यात स्वाइन फ्लूमुळे सात रुग्णांचा बळी गेला होता. जानेवारीपासून आत्तापर्यंत स्वाइन फ्लूचे ४२४ रुग्ण आढळले असून, त्यात मनपा हद्दीतील २३३, तर ग्रामीण १९१ रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत ६३ जणांचा बळी गेला असून, त्यात महापालिका हद्दीतील २३ तर हद्दीबाहेरील ४० जणांचा समावेश आहे. कथडा येथील नऊ महिन्याच्या बालकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रशासन अद्याप ते खात्रिशीर सांगत नसून संबंधित रुग्णाबाबतचे कागदपत्र मागविण्यात आले आहे. सदरच्या बालकाला तीन रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे महापालिका प्रत्येक ठिकाणी केलेल्या उपचारांची माहिती मागवित असल्याचे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले.आॅक्टोबर महिन्याच्या १ ते २६ तारखेपर्यंत ४५१ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, ९७ जणांना अधिकृतरीत्या डेंग्यू झाल्याचे तपासणीत आढळले आहे. जानेवारीपासून आत्तापर्यंत २ हजार ३०४ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहे, तर त्यातील ६२० जणांना डेंग्यू झाल्याचे अधिकृतरीत्या आढळले आहे. डेंग्यूमुळे आत्तापर्यंत एकाच रुग्णाचा बळी गेल्याचेदेखील महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यू