नाशिकरोड : मनपा निवडणुकीत नाशिकरोड विभागामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये ३२ उमेदवार कोट्यधीश असून, प्रभाग २२ मधील मनसेचा उमेदवार तानाजी सकट यांची मालमत्ता फक्त १४ हजार इतकी आहे.नाशिकरोड विभागात सर्वाधिक जास्त मालमत्ता भाजपाचे दिनकर आढाव यांची १२ कोटी ३५ लाख आहे. त्या खालोखाल संगीता गायकवाड (११ कोटी ९३ लाख), अॅड. सुनील बोराडे (१० कोटी २४ लाख), विशाल संगमनेरे (८ कोटी ४२ लाख), संभाजी मोरुस्कर (८ कोटी १७ लाख), जयराम हगवणे (७ कोटी ४ लाख), स्नेहल चैतन्य देशमुख (६ कोटी ३४ लाख), योगीता किरण गायकवाड (४ कोटी ९७ लाख), शरद मोरे (३ कोटी ९७ लाख), बाबूराव आढाव (३ कोटी ९३ लाख), अंबादास ताजनपुरे (३ कोटी ८३ लाख), जयश्री खर्जुल (३ कोटी २३ लाख), गिरीश मुदलियार (३ कोटी ६ लाख), सत्यभामा गाडेकर (२ कोटी ५७ लाख), नंदा भोर (२ कोटी ६८ लाख), संतोष साळवे (२ कोटी ४० लाख), अशोक सातभाई (२ कोटी २० लाख), मनोजकुमार रोकडे (२ कोटी १९ लाख), पंडित आवारे (२ कोटी १७ लाख), केशव पोरजे (२ कोटी १६ लाख), प्रशांत दिवे (१ कोटी ९५ लाख), रोहिणी संतोष पिल्ले (१ कोटी ९५ लाख), रंजना बोराडे (१ कोटी ८७ लाख), सतीश मंडलेचा (१ कोटी ८६ लाख), सूर्यकांत लवटे (१ कोटी ५४ लाख), लंकाबाई हगवणे (१ कोटी ५४ लाख), शिवा भागवत (१ कोटी ४७ लाख), नयना घोलप (१ कोटी ३९ लाख), वैशाली दाणी (१ कोटी ३२ लाख), विलासराज गायकवाड (१ कोटी २९ लाख), राजेंद्र डेर्ले (१ कोटी १८ लाख), सीमा ताजणे (१ कोटी १० लाख) हे शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे याप्रमुख राजकीय पक्षाचे ३२ कोट्यधीश उमेदवार आहेत. तर ५० लाखांहून अधिक तानाजी लोखंडे (५१ लाख), शीतल ताकाटे (६४ लाख), शोभा आवारे (८५ लाख), अशोक पगारे (६८ लाख), अंबादास पगारे (७७ लाख), सुनीता गायकवाड (७४ लाख), विक्रम कदम (६१ लाख), रमेश धोंगडे (९८ लाख), नितीन खोले (५१ लाख), जयश्री गायकवाड (९७ लाख), पुष्पा रोकडे (७८ लाख), सुनीता कोठुळे (७३ लाख) या १२ उमेदवारांची मालमत्ता आहे. तसेच प्रमुख राजकीय पक्षातील सर्वाधिक ५० हजारांहून कमी मालमत्ता असलेले तानाजी सकट १४ हजार, प्रेरणा चंद्रमोरे २२ हजार व नयना वाघ ३६ हजार हे तिघे आहेत. (प्रतिनिधी)
नाशिकरोडचे ३२ कोट्यधीश उमेदवार
By admin | Updated: February 14, 2017 23:51 IST