शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

डीलरशिपच्या बहाण्याने ३१ लाखांना आॅनलाइन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:19 IST

नाशिक : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना तब्बल ३१ लाख ७१ हजार रुपयांचा आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देविंचूर । कंपनीच्या नावाखाली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना तब्बल ३१ लाख ७१ हजार रुपयांचा आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.निफाड तालुक्यातील विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांनी दि. २४ जून २०२०पासून २१ आॅगस्ट २०२० या दरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिपसाठी आॅनलाइन अर्ज भरला. राहुल शर्मा नावाच्या इसमाने खोट्या भ्रमणध्वनी नंबरवरून कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे त्यांना भासविले. फिर्यादी निखिल राऊत यांनी विविध बँकांच्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाच्या बनावट खात्यावर वेगवेगळ्या प्रकारे आरटीजीएसद्वारे ३० लाख ७१ हजार ५०० रुपये भरले. मात्र यात आपली आॅनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची खोटी वेबसाइट बनवून डिस्ट्रिब्यूटरशिप देतो, असे सांगून फिर्यादीस कंपनीचे डिस्ट्रिब्यूटरशिपचे खोटे प्रमाणपत्र देऊन ३० लाख ७१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये साततत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी व्यवहार तपासूनच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी