शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

३१ प्रभाग झाले निश्चित

By admin | Updated: September 13, 2016 01:45 IST

३१ प्रभाग झाले निश्चित

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीमार्फत सोमवारी (दि.१२) राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. दरम्यान, मनपा निवडणुकीसाठी ३१ प्रभाग निश्चित करण्यात आले असून, १२२ सदस्यसंख्या कायम राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिल्याने प्रभाग आणि सदस्यसंख्येच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी कोअर कमिटीमार्फत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून तो विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने सदर प्रस्तावाची तपासणी करत महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सदरचा प्रस्ताव सोमवारी (दि.१२) राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. आता येत्या २३ सप्टेंबरपर्यंत आयोगाकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर दि. ७ आॅक्टोबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षित जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना दि. १० आॅक्टोबरला आयोगाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येऊन अंतिम प्रभाग रचना २५ नोव्हेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्तांमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. (प्रतिनिधी)