शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘आॅटोडीसीआर’ सुधारणेसाठी  ३१ डिसेंबरची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:46 IST

नगररचना विभागाच्या ‘आॅटोडिसीआर’मध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर ते नाकारणे आणि वेळेत मंजुरी न मिळणे या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या समस्येची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित आॅटोडीसीआर कंपनीला सुधारणा करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाइन दिली आहे.

नाशिक : नगररचना विभागाच्या ‘आॅटोडिसीआर’मध्ये प्रकरण दाखल केल्यानंतर ते नाकारणे आणि वेळेत मंजुरी न मिळणे या गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या समस्येची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित आॅटोडीसीआर कंपनीला सुधारणा करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. याशिवाय आता कंपनीला दाखल प्रकरणात छाननीतील त्रुटी संदर्भात सात दिवस मुदत देण्याची वेगळी तरतूद सॉफ्टवेअरमध्ये करण्याचे आदेश गमे यांनी दिले असून, कंपनीने ते मान्य केले आहे.गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेत आॅटोडीसीआरचे प्रकरण गाजत असून, बांधकाम प्रकरणे वारंवार रिजेक्ट होणे तसेच पीडीएफ फाइल न होणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेचा बांधकाम व्यवसायच ठप्प होत आहेत. यासंदर्भात बांधकाम व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी भेट घेऊन आयुक्तांना साकडे घातले होते. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२१) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कंपनीच्या प्रतिनिधी आणि महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती.आॅटोडीसीआरमध्ये फाइली मंजूर होत नसल्याने त्याबाबत तोडगा काढण्याची सूचना आयुक्तांनी करतानाच आत्तापर्यंत आॅटोडीसीआरमध्ये रखडलेल्या सर्व प्रस्ताव येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यास सांगितले. तसे न केल्यास मग त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.आॅटोडीसीआरमध्ये पीडीएफ फाइल तयार होत नाहीत. त्यामुळेदेखील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. हा तांत्रिक प्रश्न तातडीने सोडवण्यास आयुक्तांनी सांगितले कंपनीचे दोन कर्मचारी आता महापालिकेत कार्यालयीन वेळेत उपस्थित असणार आहेत. यापूर्वी फाइली मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रकार घडल्याने दोन्ही कर्मचाºयांना कंपनीने तेथून काढून घेतले होते.फर्स्ट कम, फस्ट आउट...महापालिकेत पारदर्शक कारभारासाठी आॅटोडीसीआर सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे त्यात प्रथम दाखल होणारे प्रकरण प्रथमच मंजूर होणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात जंपिंग प्रकरणे होत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनेच आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आता त्यात बदल करून प्रथम दाखल होणारे बांधकाम प्रस्तावच प्रथम बाहेर पडतील अशी सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्था करण्याचे आदेश दिले असून कंपनीनेदेखील ते मान्य केले आहे.आॅफलाइनचा प्रस्तावाचा नंतर विचारपुणे आणि प्रिंपी-चिंचवड येथील महापालिकेत नाशिकच्या अगोदरच आॅटोडीसीआर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला या महापालिकांमध्ये अडचणी आल्या असणार त्यावर त्यांनी काय उपाययोजना केल्या होत्या याचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेच्या दोन नगररचना अधिकाºयांना तेथे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर नाशिक महापाालिकेत् देखील उपाय केले जाणार आहेत. आॅफलाइनबाबतदेखील त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. मुळातच एखादी यंत्रणा सुरू केल्यानंतर त्यात सवलत देण्याचे प्रकार सुरू केले, तर मग यंत्रणाच कुचकामी ठरते असे सांगत आयुक्तांनी आॅफलाइनबाबत फार सकारात्मक नसल्याचे सांगितले.आॅटोडीसीआरमधील सुधारणा तसेच अन्य महापालिकेत आॅटोडीसीआरबाबत असलेल्या स्थितीचा महापालिका अधिकाºयांनी अभ्यास केल्यानंतर विकासक आणि वास्तुविशारदांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, आॅटोडीआरचे प्रलंबित देयक देण्यास आयुक्तांनी हिरवा कंदील दिला. या बैठकीत कंपनीच प्रतिनिधींबरोबरच नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी व उपअभियंता अग्रवाल उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त