शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

३० सराईत गुन्हेगारांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 01:41 IST

शहर व परिसरात सातत्याने घडणाऱ्या लहान-मोठ्या गुन्ह्यांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांना अखेर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री मिशन ऑल आऊट मोहीम राबवत दिलासा दिला. या मोहिमेत पोलिसांनी एकाच वेळी तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्त्यावर येत ३० सराईत गुन्हेगारांची धरपकड केली. तसेच एकूण अवैधरीत्या दारुविक्री, जुगाराच्या ३६ अड्ड्यांवर छापे टाकले. या मोहिमेने गुन्हेगारांचे धाबे पुन्हा दणाणले आहे.

ठळक मुद्देऑल आउट : दहा शस्त्रे हस्तगत ; अवैध धंद्यांचे ३६ अड्ड्यांवर छापेमारी

नाशिक : शहर व परिसरात सातत्याने घडणाऱ्या लहान-मोठ्या गुन्ह्यांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांना अखेर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री मिशन ऑल आऊट मोहीम राबवत दिलासा दिला. या मोहिमेत पोलिसांनी एकाच वेळी तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्त्यावर येत ३० सराईत गुन्हेगारांची धरपकड केली. तसेच एकूण अवैधरीत्या दारुविक्री, जुगाराच्या ३६ अड्ड्यांवर छापे टाकले. या मोहिमेने गुन्हेगारांचे धाबे पुन्हा दणाणले आहे.

मिशन ऑल आऊट, रात्रीचे कोम्बिंग ऑपरेशन, लेट नाईट फिक्स नाकाबंदी, यासारख्या मोहिमा मागील वर्षभरापासून बंद झाल्या होत्या. यामुळे शहरात गुन्हेगारी फोफावली. खून, खुनाचा प्रयत्न, चाकूहल्ले, हाणामाऱ्या, घरफोड्या, जबरी लूट, वाहनचोरी यांसारख्या सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचा आलेख उंचावला. नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६७ विविध प्रकारचे गुन्हे आयुक्तालयाच्या हद्दीत घडले. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लुटीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. खुनाच्या तब्बल पाच घटना अलिकडे घडल्याने शहर जणू गुन्हेगारांचा अड्डाच बनला की काय ? असा सवाल उपस्थित केला जात होता. गुन्हेगारांनी ‘खाकी’ ला आव्हान दिल्याचेही उघडपणे बोलले जात होते.

कोरोनाचा निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिककरांनी मंगळवारी (दि. १३) रात्री उशिरा चौकाचाैकांत पोलिसांची नाकाबंदी अनुभवली. नऊ वाजेच्या ठोक्यावर शहरातील भद्रकाली, पंचवटी, मुंबईनाका, सरकारवाडा, इंदिरानगर, गंगापूर, सातपूर, उपनगर आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस रस्त्यावर उतरले. दोन्ही परिमंडळात पोलिसांकडून सर्व उपनगरांमध्ये महत्वाच्या चौकांत पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. संशयित दुचाकीचालक, चारचाकी चालकांना थांबवून पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचे यावेळी दिसून आले.

--इन्फो--

गावठी कट्टा, कोयते, तलवारी जप्त

शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ११२ पोलीस अधिकारी व ७८६ अंमलदारांचा ताफा शहरातील रस्त्यांवर उतरला. ठिकठिकाणी नाकाबंदी, गुन्हेगारांची शोध मोहीम राबवण्यात आली. अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश असल्यामुळे अवैध मद्यसाठा वाहतूक, विक्री व साठा केल्याप्रकरणी २६ ठिकाणी कारवाई करण्यात आली. अवैध जुगार प्रकरणी ७ व गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ विरोधात तीन ठिकाणी छापे टाकण्यात आहे. बेकायदेशीररीत्या बाळगलेली दहा शस्त्रे या कारवाईत जप्त करण्यात आली. वेगवेगळ्या परिसरांतून एक गावठी कट्टा व इतर धारदार ९ शस्त्रे यामध्ये कोयता, चॉपर, सुरा यांचा समावेश आहे. विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सुमारे तीस गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक