शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांचा निधी परत जाण्याच्या भीतीने साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:13 IST

राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सुमारे ५० लाखांचा निधीदेखील खर्च न करता परत जाण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे एकतर राज्य सरकारने आपल्या वाट्याची रक्कम द्यावी किंवा केंद्र सरकारने दिलेला निधी खर्चाची परवानगी द्यावी, अशी मागणी समाजकल्याण विभागाने केली आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभाग : ४८९ आंतरजातीय जोडपे लाभापासून वंचित

नाशिक : राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सुमारे ५० लाखांचा निधीदेखील खर्च न करता परत जाण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे एकतर राज्य सरकारने आपल्या वाट्याची रक्कम द्यावी किंवा केंद्र सरकारने दिलेला निधी खर्चाची परवानगी द्यावी, अशी मागणी समाजकल्याण विभागाने केली आहे.सोमवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंतरजातीय विवाह योजनेवर चर्चा करण्यात आली. आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून त्याचबरोबर त्यांच्या संसाराला हातभार लागावा यासाठी ५० हजार रुपये मदत देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येते.या योजनेसाठी केंद्र सरकारचा निम्मा वाटा व राज्य सरकारचा निम्मा वाटा असला तरी, राज्य सरकारचा हिस्सा गेल्या तीन वर्षांपासून प्राप्त झालेला नाही. उलट सन २०१८-१९ या वर्षात केंद्र सरकारने ५० लाख व २०१९-२० या वर्षासाठी ३० लाख असे ८० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत.जोपर्यंत राज्य सरकार आपल्या हिश्श्याची रक्कम देत नाही तोपर्यंत लाभेच्छुकांना लाभ देऊ नये, अशा सूचना राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे समाजकल्याण विभागाला ही योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा परिषदेकडे या योजनेंतर्गत निधी मागणीसाठी ४८९ प्रस्ताव प्राप्त झालेले असून, आंतरजातीय विवाह करणारी जोडपी निधीसाठी चकरा मारत आहेत. समाजकल्याण समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले सन २०१८-१९ वर्षातील ५० लाख रुपये मार्चअखेर खर्च न करता ते शासनाला परत करावे लागणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यावर सरकारकडे पैसे परत पाठविण्यापेक्षा केंद्र सरकारच्या निधीतून लाभेच्छुकांना त्याचे अनुदान वितरित करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

टॅग्स :marriageलग्न