शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर-शिर्डी मार्गावर तिहेरी अपघातात २५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:14 IST

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावर वावीजवळील मिरगाव फाटा येथे खासगी आराम बस, हायवा डंपर व ह्युंडाई क्रेटा यांच्यात तिहेरी अपघात होऊन २५ जण जखमी झाले. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन गंभीर : आराम बसमधील प्रवाशांवर उपचार सुरू

सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावर वावीजवळील मिरगाव फाटा येथे खासगी आराम बस, हायवा डंपर व ह्युंडाई क्रेटा यांच्यात तिहेरी अपघात होऊन २५ जण जखमी झाले. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.खासगी आराम बस रस्त्यावर पूर्णपणे आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. अन्सारी कंपनीची ट्रॅव्हल (एमएच-०४, जेयू २१७७) शिर्डीकडे जात होती. मिरगाव फाटा येथे समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मुरूम वाहणारा खासगी हायवा (एमएच १७, बीव्ही-११७२) महामार्ग ओलांडत असताना अन्सारी कंपनीच्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. त्यानंतर ताबा सुटल्याने या ट्रॅव्हलने समोरून येणाऱ्या क्रेटाला (एमएच-१७, बीव्ही-४५९५) धडक दिली. त्यात क्रेटाचा चक्काचूर झाल्याने एक तास महामार्ग बंद होता.ट्रॅव्हल्सला डंपरने धडक दिल्याने ती क्रेटा गाडीवर उलटली; परंतु वेळीच क्रेटा कारच्या एअर बॅग उघडल्याने चालक रवींद्र गोंदकर बचावले. हवालदार प्रकाश गवळी, नितीन जगताप, सूर्यवाड, उगले यांनी मदतकार्य राबविले. सर्व जखमी खासगी आराम बसमधील प्रवासी आहेत. ते ग्रॅण्डरोड, बोरीवली येथील रहिवासी असून, शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. जखमींना शिर्डी, सिन्नर, नाशिक अशा विविध ठिकाणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातातील जखमीआर्य राहुल बेर्डे (१३), सार्थक देवेंद्र चोरगे (१२), मनीषा चेतन पवार (४२), पूजा राजेंद्र चोरगे (३३), राहुल चंद्रशेखर बेर्डे (४५), देवेंद्र देवीदास चोरगे (३७), श्वेतांबरी चंद्रशेखर बेर्डे (६७), अमृता सचिन चोरगे (४०), पूजा बेर्डे (३१), शोभा चोरगे, बंदीश पवार, चेतन पवार, बनीत पवार (सर्व रा. बोरिवली) हे जखमी झाले. तर शिवांश चोरगे, देवीदास बेर्डे, अमीर बेर्डे या गंभीर जखमींना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरू केले. वावी पोलिसांसह महामार्ग पोलीस, दरोडाग्रस्त पथकाचे वाहनही घटनास्थळी दाखल होत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. तब्बल एक तासानंतर महामार्ग सुरळीत झाला. स्थानिक नागरिकही मदतीसाठी धावून आले. जखमींना पाच ते सहा रु ग्णवाहिकेतून सिन्नरच्या खासगी रु ग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Accidentअपघात