शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

सिन्नरमधील ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:11 IST

देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे या ३४ किमी लांबीच्या बंदिस्त पूरचारीचे काम प्रगतिपथावर आहे. सुमारे १० किलोमीटर हद्दीतील काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची चिन्हे असून, दुष्काळी पूर्व भागाला नवसंजीवनी मिळणार आहे.

ठळक मुद्दे७१ कोटींचा प्रकल्प । तालुक्याच्या दुष्काळी पूर्वभागाला मिळणार नवसंजीवनी

सिन्नर : देवनदीवरील कुंदेवाडी ते सायाळे या ३४ किमी लांबीच्या बंदिस्त पूरचारीचे काम प्रगतिपथावर आहे. सुमारे १० किलोमीटर हद्दीतील काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची चिन्हे असून, दुष्काळी पूर्व भागाला नवसंजीवनी मिळणार आहे. या प्रकल्पातून पूर्व भागासाठी १०५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी सुमारे ७१.०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या प्रकल्पामुळे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.पूर्व भागासाठी संजीवनी ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे. तथापि, गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने कालवा मार्गातील बहुतांश शेतीमध्ये खरीप, रब्बीची पिके उभी आहेत. त्यांचे नुकसान होऊ न देता कामाला गती देण्याचा प्रयत्न लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदार एजन्सीने केला असल्याचे दिसून येते.देवनदीवरील सिन्नर-कुंदेवाडीच्या दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बलक बंधाºयाच्या जागी नवा सीमेंट बंधारा बांधून तेथूनच सायाळेसह २० गावांपर्यंत १६०० मिमी व्यासाच्या सीमेंट पाइपमधून पाणी नेण्यात येणार आहे. या ब्रिटिशकालीन बंधाºयातून ब्रिटिशकाळापासून अस्तिवात असणाºया दोनही पाटचाऱ्यांच्या पाण्याला कुठेही धक्का न लावता ही नवी योजना अमलात येत आहे. या योजनेसाठी देवनदीचे १०५ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून, देवनदीचे पूरपाणी वडांगळीला पोहोचल्यानंतरच या बंदिस्त पाइपलाइनमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बंधाºयात देवनदीबरोबरच शिवनदीचेही पाणी येते. दोन्ही ब्रिटिशकालीन पाट कालवा व्यवस्थेपैकी एक देवनदीच्या पाण्यातून तर दुसरी शिवनदीच्या पाण्यावरचालते. धरणाजवळ या दोन्ही कालव्यांचे पाणी धरणापासून काही अंतरापर्यंत बंद पाइपने नेऊन कालव्यांमध्ये सोडण्यात आले आहे. नव्या बंधाºयाचे काम पूर्ण होत आले आहे.असून, नदीच्या दोनही बाजूंनी सीमेंटच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत.शेती नसलेल्या मोकळ्या भागात पाइपलाइन टाकण्याचे दहा किमी लांबीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असून, गोंदे फाट्याजवळ समृद्धी महामार्ग तोडून पाइपलाइन टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. बंद पाइपलाइनमध्ये २० जागांवर चेंबर्स टाकण्यात येणार असून, पाइपलाइनमध्ये काही अडथळे आल्यास तेथून दुरु स्ती करणे शक्य होणार आहे. बंद पाइपलाइनद्वारे २० गावांमधील नाल्यांमध्ये पूरपाणी सोडण्यात येणार असून, या गावांच्या परिसरातील ४० हून अधिक पाझर तलाव, बंधारे या पूरपाण्याने भरून घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय दातली, माळवाडी व दुशिंगपूरची एम.आय. टँक भरून घेणे शक्य होणार आहे. यामुळे परिसरातील मोठे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या एकूण ३४ किमीपैकी १८ किमीपर्यंत १६०० किमी व्यासाचे, नंतरचे ७ किमी १२०० मिमी व्यासाचे व पुढे १००० मिमी व्यासाचे सीमेंट पाइप टाकण्यात येणार आहेत. बंधाºयापासून ८० क्युसेस पाणी सोडण्यात येणार असून, शेवटच्या टोकाला अवघ्या आठ तासांत पाणी पोहोचणार आहे. गोंदनाला, हाबेवाडी (मुसळगाव), फत्तेपूर, दोडी येथील नाल्यांवर लोखंडी जलसेतून बांधून पाइपलाइन वरून नेण्यात येणार आहे. गेल्या साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा दुष्काळ दूर करण्यासाठी देवनदीला येणाºया पूरपाण्यातून पूर्व भागातील २० गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी पूरचाºयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यानंतर सत्ताबदलानंतर या कामाला पुन्हा ब्रेक लागला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांनीही पुढाकार घेत सदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. दोन्ही आजी-माजी आमदारांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याने आज या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.कुंदेवाडी व सिन्नर शिवारात असलेल्या बलक तथा मापारपाट बंधाºयाच्या जागेवर नव्याने वळण बंधारा बांधण्यात आला असून, येथून कुंदेवाडी, गुरेवाडी, धोंडवीरनगर, हाबेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, खंबाळे, भोकणी, मºहळ खुर्द व बुद्रुक, सुरेगाव, दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, कणकोरी, मानोरी, फत्तेपूर, निºहाळे, फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, मलढोण व सायाळे या गावांच्या शिवारातून हा बंदिस्त पाइपलाइनद्वारे पूरकालवा साकारण्यात येत आहे. प्रत्येक गावातील बंधारे भरण्यात येणार असल्याने पूर्र्व भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. या कालव्यासाठी एकूण १४ हजार सीमेंट पाइप लागणार असून, जवळपास ३५०० पाइप तयार आहेत.

टॅग्स :water transportजलवाहतूक