शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

३९९ हिऱ्यांपासून  घडविली मौल्यवान राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:34 IST

आपला व्यवसाय आणि त्यामधील कलात्मक प्रयोगाच्या आवडीपोटी शहरातील बाफणा डायमंड गॅलॅक्सीचे संचालक जयेश बाफणा यांनी चक्क ३९९ हिरे आणि १८ कॅरेटचे सुमारे साडेसतरा ग्रॅम सोन्याचा वापर करीत आकर्षक पद्धतीची मौल्यवान राखी रक्षाबंधनाच्या औचित्यावर घडविली आहे. सध्या त्यांची हिरेजडीत राखी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

नाशिक : आपला व्यवसाय आणि त्यामधील कलात्मक प्रयोगाच्या आवडीपोटी शहरातील बाफणा डायमंड गॅलॅक्सीचे संचालक जयेश बाफणा यांनी चक्क ३९९ हिरे आणि १८ कॅरेटचे सुमारे साडेसतरा ग्रॅम सोन्याचा वापर करीत आकर्षक पद्धतीची मौल्यवान राखीरक्षाबंधनाच्या औचित्यावर घडविली आहे. सध्या त्यांची हिरेजडीत राखी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.  ‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अडीच लाख रुपये किमतीची आकर्षक कलाकुसर असलेली हिरेजडित राखी बाफणा यांनी तयार केली आहे. गेले २५ दिवस अथक परिश्रम घेऊन त्यांनी नावीन्यपूर्ण असा कलात्मक प्रयोग नाशिककरांपुढे सादर केला आहे. त्यांच्या दालनात येणाºया ग्राहकांना ही मौल्यवान राखी आकर्षित करत आहे.  या राखीमध्ये हिºयांच्या वापरासोबतच एक सिंथेटिक प्रकाराचा हिरवा खडादेखील चपखलपणे वापरला गेला आहे. यामुळे राखीचे सौंदर्य आणि आकर्षण अधिकाधिक वाढले आहे.या राखीची रचना अत्यंत साधी जरी ठेवली असली तरी ती अधिकाधिक आकर्षक व मनाला मोहिनी घालणारी आहे, असे बाफणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राखी बनविण्यासाठी मोठे आव्हान होते, ते म्हणजे तिच्या पारंपरिक लूकचे. मात्र हे आव्हान आम्ही सहज स्विकारले आणि अथक परिश्रम घेऊन मोठ्या कौशल्याने पारंपरिक मौल्यवान राखी घडविण्यास यश आल्याचे बाफणा म्हणाले. ही राखी तयार करताना मानवी हस्तकला आणि यांत्रिक वापराची सुरेख सांगड घालण्यात आली आहे. रक्षाबंधानाच्या पार्श्वभूमीवर जी बहीण आपल्या भावासाठी ही मौल्यवान राखी खरेदी करेल, तो भाऊ नक्कीच भाग्यवान ठरेल.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनRakhiराखी