शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 13:02 IST

जायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते.

जायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते. सरस्वती पुजन करु न कार्यक्र मास सुरु वात करण्यात आली. यानंतर दिवंगत मित्र - मैत्रिणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी २८ वर्ष जुन्या आठवणीना उजाळा देत शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेले ज्ञान व संस्कारा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सन १९९१ मध्ये दहावीची शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या दिशेला गेलेले मित्र-मैत्रिणींनी ठीक ठिकाणाहून येऊन भेटल्याने भारावून गेले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्नेहभेटीचा आनंद दिसत होता. भेटीला भावनेची किनार होती. सुमारे तीस पस्तिस माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांच्या नोकरी व्यवसाय, कुटुंबाविषयी जाणुन घेतले. अनेक वर्षांनी एकञ आल्याने विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी शालेय जीवनात चांगल्या कामासाठी मिळालेली शाब्बासकी तर अभ्यासात कुचराई केल्याबद्दल मिळालेली शिक्षा, यातुन घेतलेला बोध व जीवणाला मिळालेली कलाटणी याचे अनुभव अनेकांनी यावेळी कथन केले. अनेक वर्षांनी मिञ भेटलेल्याचा परमोच्च आनंद सर्वांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याच्या संगोपनाचा निश्चय यावेळी करण्यात आला. पुढील कार्यक्र म घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली व भविष्यात एकता ग्रुप च्या वतीने सामाजिक उपक्र म राबण्याबाबतही नियोजन करण्यात आले. सूत्रसंचालन जयंत देवरे यांनी तर प्रास्ताविक जयवंत खैरनार यांनी केले.किरण पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक