नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक तपासणी मोहीम राबविली़ त्यामध्ये शहरातील २८ फटाके विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडील १ लाख ११ हजार १९३ रुपयांचे फटाकेही जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये भद्रकाली पोलिसांत फरिदा काईद बेंगवाला (रा. शालिमार), म्हसरुळ पोलिसांत सतीश संपत सांगळे (रा. मखमलाबाद शिवार), वसंत मोतीराम खराटे, राजेंद्र चावदास भोई, विजू चावदास भोर्स, ताराचंद अर्जून वाघ, नीलेश भानुदास टिमकरे, संदीप रामदास सदगीर, कैलास जयराम बेंडकोळी, रवी गायकवाड, योगेश चंद्रकांत लोखंडे, सातपूर पोलिसांत संजय भिलू लक्ष्मण देवडे (रा. श्रमिकनगर), अन्वर रशिद मांडल (रा. श्रमिकनगर), मुंबई नाका पोलिसांत जुबेर इकबाल शेख (रा. भाभानगर), शोभा दत्तू निकुळे (रा. भारतनगर), गंगापूर पोलिसांत प्रीतम नरेंद्र गिरासे (गंगापूरगाव), अंबड पोलिसांत विनय रामकृष्ण पाटे (रा. सिडको), विजय दिगंबर वाणी (रा. सावतानगर, सिडको), योगेश सुकदेव तडाखे (रा. मोरगाव), सुनील अशोक अमृतकर (रा. त्रिमूर्ती चौक) तर इंदिरानगर पोलिसांत अभिजित एकनाथ लिटे (रा. पाथर्डी फाटा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
28 फटाके विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
By admin | Updated: October 31, 2016 02:07 IST