शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

२७५ अपक्ष निवडणूक रिंगणात

By admin | Updated: February 17, 2017 23:36 IST

आठ नगरसेवकांचा समावेश : तेरा माजी नगरसेवकांना वेध

नाशिक : चार सदस्यीय प्रभाग रचना आणि प्रभागाची मोठी व्याप्ती लक्षात घेता यंदा महापालिका निवडणुकीत अपक्षांची संख्या घटणार, असा दावा केला जात असताना तब्बल २७५ अपक्षांनी उमेदवारी करत सदर दावा फोल ठरविला आहे. अपक्षांमध्ये आठ विद्यमान नगरसेवकांचा समावेश असून, तेरा माजी नगरसेवकांनीही ‘एकला चलो रे’चा नारा लगावत पुन्हा पालिकेत पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहिले आहे. महापालिका निवडणुकीत यंदा एकूण ८२१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यात राष्ट्रीय पक्षांचे २६२, राज्यस्तरीय पक्षांचे २२१, छोट्या पक्षांचे ६३ तर तब्बल २७५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यंदा राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणावर नाराजी समोर आल्याने बंडखोरी झालेली आहे. त्यातूनच काही उमेदवारांनी मिळेल त्या राजकीय पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेतली, परंतु अनेकांना अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अपक्षांमध्ये बव्हंशी हौशे-नवशेही आहेत. परंतु, आठ विद्ममान नगरसेवक अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा अपक्ष निवडून आले होते. त्यातील दामोदर मानकर यांना भाजपाची उमेदवारी मिळाली आहे, तर अन्य अपक्ष नगरसेवक उपमहापौर गुरुमित बग्गा, रशिदा शेख, संजय चव्हाण व पवन पवार हे पुन्हा एकदा अपक्ष लढत आहेत. याशिवाय, कॉँग्रेसच्या नगरसेवक विमल पाटील, नाशिकरोड भागात पाच महिन्यांपूर्वीच पोटनिवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या मंदा ढिकले, राष्ट्रवादीचे नगरसेवक हरिष भडांगे, मनसेतून सेनेत गेलेले अरविंद शेळके हेसुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.  विद्ममान नगरसेवकांबरोबरच १३ माजी नगरसेवकांनीही अपक्ष उमेदवारी करत नशीब अजमावणे ठरविले आहे. त्यात रुक्मिणी कर्डक, भगवान भोगे, मधुकर हिंगमिरे, राजेंद्र नागरे, सुरेश पाटील, सविता गायकवाड, वंदना मनचंदा, रमेश जाधव, सुशीला खरोटे, संजय अढांगळे, सतीश खैरनार, शोभा दोंदे यांचा समावेश आहे. माजी नगरसेवक गोटीराम वरघडे यांच्या पत्नी जिजाबाई वरघडे, माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र प्रेम पाटील, माजी नगरसेवक नंदू जाधव यांच्या पत्नी रेखा जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांच्या पत्नी सीमा बागुल, माजी नगरसेवक दिलीप दातीर यांच्या पत्नी अरुणा दातीर हेसुद्धा नशीब अजमावत आहे. कुठे आघाडी, कुठे एकला चलो रे...महापालिका निवडणुकीत काही अपक्षांनी एकत्र येत आपल्या प्रभागात आघाडी केली आहे. त्यात प्रामुख्याने, प्रभाग ५ मध्ये उपमहापौर गुरुमित बग्गा, कॉँग्रेसच्या विमल पाटील, मनसेचे उल्हास धनवटे व नंदिनी बोडके यांनी आघाडी करत एकत्र प्रचार चालविला आहे.  तर प्रभाग ३० मध्ये संजय चव्हाण, शेख रशिदा यांचा एबी फॉर्मचा घोळ झाल्याने त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केले असले तरी ते अपक्ष म्हणूनच लढत देत आहेत. प्रभाग ४ मध्येही भगवान भोगे यांच्याबाबतीत तशीच स्थिती आहे. विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक अपक्ष म्हणून लढत देत असताना अन्य अपक्षांनी मात्र आपापल्या स्तरावर प्रचार चालविला आहे. त्यातील बव्हंशी अपक्षांमागे कार्यकर्त्यांचे पाठबळ नसल्याने त्यांची अवस्था बिकट आहे.