शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

लासलगाव बाजार समितीसाठी २७२ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: March 20, 2016 23:06 IST

निवडणूक : तिरंगी लढत होणार, महिला राखीव गटासाठी २० अर्ज दाखल

 लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.निवडणुकीत सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघात ९७ उमेदवारी अर्ज, सोसायटी महिला राखीव गटाकरिता २० उमेदवारी अर्ज, सोसायटी इतर मागास प्रवर्गाकरिता २१ उमेदवारी अर्ज, सोसायटी भटक्या विमुक्त जमातीकरिता १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ग्रामपंचायत मतदारसंघात साधारण मतदारसंघात ४१ उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमातीकरिता १६ उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकाकरिता २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये माजी आमदार कल्याणराव पाटील तसेच विद्यमान सदस्य मंडळातील सदस्य नानासाहेब पाटील, जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, विजय सदाफळ, इंदुमती तासकर, तान्हाजी पूरकर, शिवाजी तासकर, बबन सानप, शिवाजी ढेपले, नंदकुमार डागा, सचिन ब्रह्मेचा, दिलीप गायकवाड, सुभाष कराड, डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, दत्तात्रय डुकरे, मधुकर गायकर, ज्ञानेश्वर गांगुर्डे, अशोक गवळी, भीमराज काळे, आशिष मोगल, रामकृष्ण दराडे, अनिल क्षीरसागर, विशाल पालवे, सुनील शिंदे, संजय वाकचौरे, बाळासाहेब दराडे आदिंचा समावेश आहे.दरम्यान, बाजार समितीच्या या निवडणुकीत प्रस्थापितांमुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नसल्याने वाढणारी इच्छुकांची गर्दी नेत्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे. तिसरे पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.लासलगाव बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. तिरंगी लढत होण्याचे संकेत प्राप्त होत आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कामकाज पहात आहे. परंतु ईडीच्या कारवाईत ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे समर्थक काय करणार याची चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)