शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाला २७पर्यंत संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:51 IST

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण ...

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली असून, १७ ते २७ जून या कालावधीत पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.दुसºया सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे तसेच आरटीईच्या संकेतस्थळावर अ‍ॅप्लिकेशन व्हाइज डिटेल्स यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाºया २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यानंतर एप्रिलच्या दुसºया आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर दोन महिने झाल्यानंतर अखेर दुसरी सोडत जाहीर झाली. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यात महिनाभराचा कालावधी गेला. त्यानंतर पालक दुसºया सोडतीच्या प्रतीक्षेत असताना अर्ज दुरुस्तीसाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यातही महिनाभराचा कालावधी गेल्याने पहिल्या सोडतीनंतर तब्बल दोन महिने उलटल्यानंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात आली असून, अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.पहिल्या फेरीत २ हजार ४८४ प्रवेशआरटीई प्रवेशप्र्रक्रियेच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये आरटीईच्या ५७३५ जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाभरातून सुमारे संख्या १४ हजार ७७५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून केवळ ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांनाच प्रवेशाची संधी मिळाली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र २ हजार ४८४ विद्यार्थ्यांचेच प्रवेश होऊ शकले होते. त्यामुळे उर्वरित जागांसाठी काढण्यात आलेल्या दुसºया सोडतीत दोन हजार ३७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी