शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

वणीजवळ ट्रक अडवून २७ लाखांची लूट

By admin | Updated: October 24, 2016 01:19 IST

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल : फरारी क्लीनरसह ट्रकचा शोध सुरू

वणी : मालेगाव येथून कापड घेऊन अहमदाबाद येथे ते खाली करून परतीच्या प्रवासात अहमदाबाद परिसरातून पुणे येथे भाडे घेऊन जाणाऱ्या ट्रकला वणी- सापुतारा रस्त्यावरील माळे दुमाला शिवारात स्कॉर्पिओ कार आडवी लावून ट्रकमधील ऐवजासह २७ लाख ३४ हजार रु पयांच्या ऐवजाची जबरी लूट करणाऱ्या पाच अज्ञात संशयितांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकमधील क्लीन्नर फरार झाल्याने पोलीस त्याचा व ट्रकचा शोध घेत आहेत .सल्लाउद्दीन बदरूद्दीन शेख (३५, रा. मालेगाव) हे स्वमालकीचा ट्रक (क्र. एमएच १८ एए ०६३५ यात कापड घेऊन वसीम मुसा शेख क्लीन्नर (रा. रमजानपुरा, द्याने, मालेगाव) यांच्यासमवेत साजिसा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून २० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पिंपलज (अहमदाबाद) येथे जाण्यासाठी निघाले. २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ते इच्छित स्थळी पोहचले. त्या ठिकाणी माल खाली करून २३ आॅक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास वणी-सापुतारा रस्त्यावरून येत असताना माळे फाटा परिसरात विनाक्रमांकाची हिरव्या रंगाची स्कॉंर्पिओ कार पाठीमागून आली. ट्रकपुढे ती आडवी लावली. त्यातून अज्ञात चार इसम उतरले. दोन चालकाच्या बाजूने  २ क्लीन्नरच्या बाजुने ट्रकच्या केबीनमधे चढले आम्ही पोलीस आहोत असे सांगुन मालाची बिल्टी दाखव असे धमकावुन शिवीगाळ व मारहाण केली व त्यापैकी एक इसम ट्रक चालविण्यास बसला वणीपासुन २ किलोमीटर अंतरावर ट्रक थाबवुन ट्रकमालक व क्लीनर यांना स्कॉपीओत बसविले तदनंतर वणी पिपळगाव रस्त्यावरून पिपळगाव येथे त्याना नेले पिंपळगाव चौफुली परिसरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ ट्रकचा वेग कमी झाल्याने सल्लाउद्दीन यांनी उडी मारली व वसीमला लाथ मारल्याने तो ट्रक बाहेर पडला त्यांनी रस्त्यावर येणाऱ्या एका दुचाकीला थांबवुन चालकाला माहिती दिल्याने त्याने पोलिसांना ही माहिती देणेबाबद सुचिवले पिपळगाव पोलीस ठाण्यात हा प्रकार कथन करत असताना क्लीन्नर वसीम मुसा शेख तेथुन फरार झाला पिंपळगाव पोलीसांनी नियंत्रण कक्षाला ही बाब कळविताच पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे पोलीस उपअधिक्षक देवीदास पाटील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले अनिल धुमसे रवि शिलावट यांनी घटनास्थळी धाव घेतली व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना ही माहिती दिली. पोलीस निरीक्षकÞ अनंत तारगे पोलीस उपनिरिक्षक नितीन पाटोल पोलीस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी अधिक तपास पोलीस उपअधिक्षक देवीदास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करित आहेत.( वार्ताहर )अहमदाबादहून परतीचा प्रवासपरतीच्या भाड्यासाठी २२ आॅक्टोबर रोजी सायं. ५ वाजता परिचित गणेश मॅनेजर यांची भेट घेतली. तेव्हा गुजरात भागाच्या अहमदाबाद येथील अस्लाली भागातून जलपरी साड्यांचे २०० बॉक्स, किरकोळ स्वरूपाच्या वस्तू असा १६ टन वजनाचा माल पुणे येथे घेऊन जायचा आहे, असे सांगितल्याने हा माल घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले.वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडल्याने सदर पथक माळे शिवारात पोहचले व पाहणी केली. ३० हजार रु पये रोख, १४०० रु पयांचे भ्रमणध्वनी, २० लाख रु पयांचा ट्रकमधील ऐवज व सात लाख रु पयांचा ट्रक असा एकूण २७ लाख ३१ हजार ४०० रुपयांच्या ऐवजाची लूट करण्यात आल्याची फिर्याद दाखल झाली आहे. दरम्यान, पिंपळगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.