शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात २७ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:30 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखतानाच कुणीही यात बळी जाऊ नये यासाठी अहोरात्र झटणाºया आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत आहे. सिन्नरच्या आरोग्य यंत्रणेने कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना टप्प्या-टप्प्याने डिस्चार्ज दिला आहे.

सिन्नर : राज्यात, देशात तसेच जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखतानाच कुणीही यात बळी जाऊ नये यासाठी अहोरात्र झटणाºया आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येत आहे. सिन्नरच्या आरोग्य यंत्रणेने कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना टप्प्या-टप्प्याने डिस्चार्ज दिला आहे. आतापर्यंत तालुक्यात तब्बल ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, त्यापैकी जवळपास २७ रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.राज्यभरात विशेषत: मुंबई, पुणे या शहरांत कोरोना धुमाकूळ घालत असताना पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन काळात सिन्नर तालुक्यात प्रशासनासह आरोग्य विभागाने विशेष काळजी घेतल्याने कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नव्हता. दुसºया टप्प्यातील लॉकडाऊन काळात नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. अगदी लासलगाव येथे रुग्ण आढळून येत असतानाही सिन्नर तालुका कोरोनापासून दूर होता. तथापि मालेगाव येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीस गेलेल्या वारेगाव येथील पितापुत्रास कोरोनाची बाधा झाली आणि सिन्नर तालुक्यात एप्रिलच्या मध्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तथापि आरोग्य विभागाने कुठलीही सुुविधा नसताना अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मदतीने कठोर पावले उचलत कोरोना बाधितांची संख्या दोनवर रोखण्यात यश मिळविले होते. तथापि गेल्या १५ दिवसांत मुंबईसह कोरोनाबाधित क्षेत्रातून तालुक्याच्या ग्रामीण भागात येणाºया नागरिकांमुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली होती.विशेषत: दापूर येथे दिवसागणिक रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा विस्फोट होतो की काय अशी भीती परिसरात व्यक्त केली जात होती.येथील उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी देशवंडी येथील २० वर्षांची तरुणी, फुलेनगर येथील ५४ वर्षे वयाचा पुरुष, संगमनेर येथील ३८ वर्षे वयाचे दापूरला प्रॅक्टिस करणारे डॉक्टर, दापूर येथील ४२ वर्षे वयाचे पुरुष कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर गुरुवारी देशवंडी येथील ७३ वर्षीय वृद्ध, ४० व २५ वर्षीय पुरुष आणि १६ वर्षीय मुलगा कोरोनावर मात करून घरी परतले. ४ जून बुधवारी दापूर येथील ५, फुलेनगर (माळवाडी) येथील ३ तर निमगाव-सिन्नर येथील तरुणाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता तालुक्यात केवळ ७ रुग्ण असून त्यापैकी दोघांवर नाशिक येथे तर ५ जणांवर सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. दापूर येथील ६ वर्षीय बालक, ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह ६२, ४८ व ३५ वर्षीय महिला तर फुलेनगर येथील २२ वर्षीय तरुणासह ३९ व ३७ वर्षीय महिला तसेच मूळचा निमगाव-सिन्नर येथील व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या तरुणही कोरोनातून सहीसलामत ठीक झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात आता केवळ दापूर येथील ४२ वर्षीय पुरुष, १२ व ८ वर्षीय मुली, गुळवंच येथील ४४ वर्षीय पुरुष व कोनांबेतील २० वर्षीय तरुणीवर उपचार सुरु आहेत तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य