शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडचे २७ कार्यकर्ते निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 17:03 IST

न्यायालयाचा निकाल : मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास केला होता विरोध

ठळक मुद्देखटल्याचे कामकाज राजगुरूनगर (खेड) न्यायालयात चालले. दि. २९ जानेवारी रोजी या खटल्याचा निकाल लागला.

सिन्नर : मराठा आरक्षणाबाबात ठोस भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ १९ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टर शिवनेरी किल्ल्यावर उतरवण्यास विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या २७ कार्यकर्त्यांची राजगुरूनगर (खेड) येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या कार्यकर्त्यांचे नेतृत्व सिन्नरच्या डी. डी. गोर्डे यांनी केले होते.मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा कार्यकर्ते संतप्त झाले होते. संभाजी ब्रिगेडने आक्रमक रूप धारण केले होते. दरवर्षी १९ फेब्रुवारी राजी शिवजयंतीला राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरीवर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. १९ फेबु्रवारी २००९ रोजी अशोक चव्हाण यांना शिवनेरीवर आल्यास तेथे पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका संभाजीत ब्रिगेडने घेतली होती. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर गडावर पोहचण्यापूर्वीच ब्रिगेडच्या ३ हजारपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी हेलिपॅडसह परिसरात गर्दी केली होती. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला होता. त्यातून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तेथेच निषेध सभा घेत हा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांना पोलिसांनी शिवनेरीच्या पायथ्याशीच स्थानबद्द केले होते. त्यामुळे सिन्नरचे डी. डी. गोर्डे यांनी आक्रमक भाषण करीत पोलिसांच्या कारवाईला निषेध केला होता. यावेळी धक्काबुक्की होऊन त्यात गोर्डे जखमी झाले होते. त्याचवेळी जमाव संतप्त होऊन पोलिसांबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवरही दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता. कार्यक्रम आटोपताच पोलिसांनी २७ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांची धरपकड सुरू केली होती. गोर्डे यांच्यासह २७ कार्यकर्त्यांना येरवडा जेलमध्ये १० दिवस काढावे लागले होते. त्यानंतर पुण्याच्या न्यायालयात दाव्याचे काम चालले होते. पूढे या खटल्याचे कामकाज राजगुरूनगर (खेड) न्यायालयात चालले. दि. २९ जानेवारी रोजी या खटल्याचा निकाल लागला. न्यायालयाने सर्व २७ कार्यकर्त्यांची निर्दोेष मुक्तता केल्याचे गोर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड