शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
4
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
5
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
6
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
7
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
8
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
9
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
10
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
11
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
12
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
13
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
14
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
15
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
17
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
18
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
19
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
20
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार

२६ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 27, 2015 23:55 IST

भोजापूर धरण : शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता धडक कारवाई

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पाटबंधारे, महसूल, वीज वितरण व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने धडक मोहीम राबवत वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. धरण क्षेत्रातील सुमारे २६ वीज रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दहा वीज रोहित्रांचे गाळे उतरविण्यात आले आहे. दापूरसह काही भागातील शेतकऱ्यांनी यास विरोध केला. मात्र पथकाने विरोध मोडीत काढीत कारवाई केली. भोजापूर धरणात केवळ ४० टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक राहिले आहे. या धरणातील मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. यावर्षी धरण न भरल्याने रब्बीसाठी आवर्तन सुटेल की नाही याची शाश्वती नसताना धरणातून अवैध पाणी उपसा केला जात होता. याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. धरणातील पाणी योजनांसाठी आगामी पावसाळ्यापर्यंत शिल्लक राहावे यासाठी अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी शुक्रवारी धरणक्षेत्रात संयुक्त मोहीम राबविण्यात आली होती. त्यांनी भोजापूर प्रकल्पाच्या जलाशया सभोवतालचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई केली. दापूर : चापडगाव, चास, कासारवाडी व सोनेवाडी शिवारात सदर कारवाई करण्यात आली. या भागातील २६ रोहित्रांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहे.तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत महसूलचे नायब तहसीलदार प्रशांत पाटील, मंडल अधिकारी संजय गाढे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विनायक इंगळे, सहायक अभियंता दत्ता पगार, आलेशकुमार लंके, नामदेव शेळके यांच्यासह २७ कर्मचारी, पाटबंधारे खात्याचे उपअभियंता आर. टी. बागुल, शाखा अभियंता ए. के. आचट, वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मुख्तार सय्यद यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने सदर कारवाई केली. (वार्ताहर)