शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२६ लाख लूट प्रकरणातील टोळी पोलिसांकडून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:24 IST

वणी : नाशिक - पेठ रोडवरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोलच्या २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

वणी : नाशिक - पेठ रोडवरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोलच्या २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. टोळीपैकी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित संशयितांना लवकरचअटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक-पेठ रस्त्यावर आशेवाडी शिवारात अज्ञात संशयितांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रकपुढे कार आडवी लावून चालक व क्लीनर यांना मारहाण करून ट्रक व त्यातील प्लॅस्टिक पेपर रोल व भ्रमणध्वनी, रोख रक्कम असा २६ लाख ६,२०० रु पयांच्या ऐवजाची जबरी लूट केली होती.याबाबत दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाचे बारकावे, गुन्हा करण्याची पद्धत याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांच्याकडे समांतर सोपवला. गुन्ह्याबाबत पोलिसांना मालेगावचे धागेदोरे मिळाले. मालेगाव येथील अझहरखान वाजीदखान (३०, रा. प्लॉट नं ९, सर्व्हे नं. ७९, उमराबाग, देवीचा मळा) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवला असता मैहेफुस बाबू, जफर, सलमान व नन्हे या साथीदारांच्या मदतीने जबरी लूट केल्याची त्याने कबुली दिली.---------------पोलिसी खाक्या दाखवितास संशयिताकडून कबुलीट्रक मालेगाव येथे नेऊन मलिक अहमद रा. धुळे याला ट्रकमधील माल विकल्याची माहिती दिली. ईटीआस कंपनीची कार (क्र. एमएच ०३ बीई ०३८२) भाड्याने घेऊन घोटी, मुंबई, गुजरात राज्यातील वापी असा प्रवास करत वापी येथून ट्रकचा (क्र . केए ५६ १९४५) पाठलाग केला व पेठरोडवर ट्रक अडवून लूट केली, अशी माहिती दिली. तसेच १२ ते १३ दिवसांपूर्वी मुंबई -आग्रारोडवर कसारा गावाजवळ ट्रक अडवून लूट केली होती. त्यातील काही माल चोरून त्याची विक्र ी केली व ट्रक संगमनेर येथे सोडून दिल्याची माहिती तपासात पोलिसांना मिळाली.-0-----------------------------ट्रकसह कार जप्तरासेगाव येथे लुटलेला ट्रक व गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, कसारा भागात केलेल्या जबरी लुटीबाबत ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोरी पोलिसांच्या तपासपूर्तीनंतर सदर संशयितांना ठाणे पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.--------------सराईतांची माहिती गोळावणी पोलीस ठाण्याअंतर्गत तिसगाव पेट्रोलपंपावर कळवण पोलीस ठाण्याअंतर्गत नांदुरी पेट्रोलपंपावर, तर दिंडोरी पोलीस ठाण्याअंतर्गत आशेवाडी शिवार अशा तीनही ठिकाणी जबरी लुटीच्या घटना आठवडाभरात झाल्याने डॉ. आरती सिंह व शर्मिष्ठा वालावलकर यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. अशा प्रकारचे गुन्हे करणाºया सराईत टोळ्यांची माहिती संकलित केली.

टॅग्स :Nashikनाशिक