शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

आश्रमशाळांसाठी २६ रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:45 IST

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अटल आरोग्य वाहिनी’ अभियानांतर्गत नाशिक विभागातील आश्रमशाळांसाठी २६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अटल आरोग्य वाहिनी’ अभियानांतर्गत नाशिक विभागातील आश्रमशाळांसाठी २६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले, तर नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनसमोर अधिकाºयांनी रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले.  राज्यातील दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी आणि उपचाराविना त्यांना राहता येऊ नये यासाठी रुग्णवाहिका सुविधा पुरविण्यात आली आहे. या सुविधेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दुहेरी लाभ होणार आहे. एकतर त्यांची नियमित आरोग्य तपासणी होऊन त्यांना असणाºया आजाराविषयीची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होईल. तसेच तपासणीअंति आढळणाºया अथवा अकस्मात उद्भवणाºया आजारावर उपचार केले जातील.प्रत्येकी चार ते सहा आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांचा एक समूह, असे ४८ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लस्टरसाठी एक याप्रमाणे ४८ सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास मैदानात असतील. बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस)सह सज्ज असणाºया या रुग्णवाहिकांमध्ये दोन डॉक्टर्स व एक आरोग्य सहायक उपलब्ध असणार आहे.या योजनेअंतर्गत नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांसाठी २६ अद्ययावत रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका सायंकाळी आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त दशरथ पानमंद, अपर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद, बाळासाहेब कंक्राळे, प्रदीप पोळ, शशिकला आहिरराव, एस. एस. पवार, एस. आर. गायकवाड, विजय मोरे, नीलेश अहिरे, सुरेश जाधव, आनंद तारगे, संजय पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य शिक्षण सभापती यतिंद्र पाटील यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्यात आल्या. यावेळी आदिवासी विकास विभागातील अधिकारी, बिव्हिजीचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.केंद्र शासनाच्या योजनेतून या रुग्णवाहिका आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहेत. धुळे, नंदुरबार, तळोदा, कळवण आणि राजूर प्रकल्पासाठी रुग्णवाहिका रवाना करण्यात येणार आहेत. बीव्हीजीच्या अधिपत्याखाली या रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेप्रमाणेच काम करणार आहेत.- दशरथ पानमंद, सहआयुक्त

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाSchoolशाळा