शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शनि चौकातील पेशवेकालीन रहाडीला २५० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:53 IST

रंगोत्सवाच्या निमित्ताने पंचवटीतील शनि चौकात असलेली पेशवेकालीन रहाड खुली करण्याच्या कामाला सोमवारी (दि. ५) सकाळपासून सुरुवात करण्यात आली. सकाळी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सुनील महंकाळे, चिंटू भोरे, बंटी भोरे आदींसह मान्यवरांच्या हस्ते रहाडीचे विधीवत पूजन करून श्रीफळ वाढवून खोदकामाला सुरुवात करण्यात आली.

पंचवटी : रंगोत्सवाच्या निमित्ताने पंचवटीतील शनि चौकात असलेली पेशवेकालीन रहाड खुली करण्याच्या कामाला सोमवारी (दि. ५) सकाळपासून सुरुवात करण्यात आली. सकाळी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सुनील महंकाळे, चिंटू भोरे, बंटी भोरे आदींसह मान्यवरांच्या हस्ते रहाडीचे विधीवत पूजन करून श्रीफळ वाढवून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. नाशिक शहरातील जुनी पेशवेकालीन रहाड असलेल्या या रहाडाला तब्बल २५० वर्षांचा इतिहास असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.  मंगळवारी (दि. ६) रोजी दुपारी रहाडीचे मानकरी कल्पेश दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येईल त्यानंतर दीक्षित सुरुवातीला रहाडीत आंघोळ करतील व त्यानंतर रंगोत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे. सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, शनिचौक मित्रमंडळ व सरदारचौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी रहाडीत रंगोत्सवाचे आयोजन केले जाते. १६ बाय १६ फूट लांबी व रुंदी असलेल्या रहाडीची ९ फूट खोली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही या रहाडीत गुलाबी रंग तयार केला जाणार आहे. रहाडीत दरवर्षी केल्या जाणाºया गुलाबी रंगाचे वैशिष्टे म्हणजे गुलाबी रंग उठावदार दिसतो तसेच या रंगामुळे उन्हाळा बाधत नाही आणि त्वचा रोग बरे होतात. रहाड म्हणजे पूर्वीच्या काळात पहिलवान तसेच गटातटाचे वर्चस्व प्रस्थापित करणाºयांची जागा अशी ओळख होती. रंगाने भरलेल्या रहाडीत आंघोळ केल्यास किमान दोन ते तीन दिवस रंग निघत नाही. अंदाजे सव्वा लाख लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या या रहाडात धप्पा मारल्यानंतर रहाडीभोवती उभ्या असलेल्या किमान ३० ते ३५ नागरिकांच्या अंगावर रंग उडतो. मंडळांचे अध्यक्ष संतोष भोरे, राजेंद्र अदयप्रभु, मनोज अदयप्रभु, रघुनंदन मुठे, अरविंद विसपुते, महेश महंकाळे आदिंसह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचे सावट पसरल्याने पाण्याची बचत व्हावी, या हेतूने मंडळाच्या आयोजकांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून रहाड बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी तसेच यंदाही धरणात भरपूर जलसाठा शिल्लक असल्याने रंगोत्सवासाठी रहाड खुली करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नाशिक शहरातील पेशवेकालीन रहाड म्हणून ओळखल्या जाणाºया शनिचौकातील या रहाडीत रंगोत्सवानिमित्ताने रंग खेळण्यासाठी तमाम नाशिककर तसेच शेकडो आबालवृद्ध सज्ज झालेले आहेत.

टॅग्स :colourरंगNashikनाशिक