नाशिक : इगतपुरीतील अलिशान बंगल्यात अभिनेत्री हिना पांचालसह २२ व्यक्ती रेव्ह पार्टीत छाप्यात पकडले गेले होते. न्यायालयाने मंगळवारी (दि.२९) ३ पुरुष आणि ११ महिला अशा २५ संशयितांची पोलीस कोठडी ५ जुलैपर्यंत वाढविली आहे.स्काय ताज आणि स्काय लगून व्हिला या बंगल्यांमध्ये ‘बिग-बॉस’ या मराठी सीझन - २ मध्ये सहभागी अभिनेत्री हिना पांचालसह बॉलिवूडशी संबंधित कलाकार, कोरिओग्राफर असे २२ तरुण-तरुणी पकडले गेले होते. गुन्ह्यातील संशयितांची संख्या २९वर जाऊन पोहोचली होती. ७ पुरुषांवर एनडीपीएस कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित दहा पुरुषांसह ११ महिलांविरुद्ध देखील कारवाई करण्यात आल्याचे अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.चार बंगल्यांचा मालकस्काय ताज, स्काय व्हिला लगून या दोन बंगल्यांचाच नव्हे तर इगतपुरीत अशा प्रकारचे चार बंगल्यांचा मालक असलेल्या रणवीर सोनी यांनाही या रेव्हपार्टीप्रकरणी पाेलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. तो व्यावसायिक असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
हिना पांचालसह २५ संशयितांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 01:32 IST
इगतपुरीतील अलिशान बंगल्यात अभिनेत्री हिना पांचालसह २२ व्यक्ती रेव्ह पार्टीत छाप्यात पकडले गेले होते. न्यायालयाने मंगळवारी (दि.२९) ३ पुरुष आणि ११ महिला अशा २५ संशयितांची पोलीस कोठडी ५ जुलैपर्यंत वाढविली आहे.
हिना पांचालसह २५ संशयितांना कोठडी
ठळक मुद्देरेव्ह पार्टी : बंगला मालकासही केली अटक