शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

कोट्यातील २५ टक्के प्रवेश आॅनलाइन

By admin | Updated: February 16, 2016 00:33 IST

मनमाड : नांदगाव तालुक्यातील १४ शाळांचा समावेश

मनमाड : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आधार कायद्यान्वये राज्य शासनाने शासनमान्य विविध प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी ठेवल्या आहेत.येत्या शैक्षणिक वर्षापासून हे प्रवेश आॅनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मनमाड शहरातील सात शाळांसह नांदगाव तालुक्यातील १४ शाळांना हे प्रवेश बंधनकारक आहे. सदरची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी मंदोदरी पाटील यांनी दिली.तळागाळातील अनेक विद्यार्थ्यांना हालाखीच्या परिस्थितीमुळे उच्च दर्जाचे शिक्षण घेता येत नाही. चांगल्या शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असतानाही या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अडचणीचे ठरते. यावर मात करण्यासाठी शासनाने शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेबसाइटवरून हे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. संच मान्यतेसाठी शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले यूजरनेम आणि पासवर्ड वापरून हे प्रवेश करता येतील. या बाबत तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी बी.टी. चव्हाण यांनी सांगितले.प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा रहिवासी पुरावा, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जन्मदाखला, विद्यार्थ्यांचे रंगीत छायाचित्र अशी कागदपत्रे प्रवेशाच्या वेळी पालकांना शिक्षण विभागाकडे स्कॅन करून पाठवावी लागणार आहेत. (वार्ताहर)