शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या ग्रामसेवकांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 21:47 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याविषयी माहिती दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकासनीचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी ग्रामसेवकांनी नेमून दिलेल्या गावातील नुकसानग्रस्त पीक पंचनामे दि.१ नोव्हेंबरपासून सुरू केले आहे. 

ठळक मुद्देनाशिक जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे शेतकऱ्यांना मदतीचा हातनूकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय

नाशिक : परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गावखेड्यात काम करणाऱ्या ग्रामसेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन देऊन मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाभरातील ग्रामसेवकांच्या एक दिवसाच्या वेतनातून सुमारे २५ लाख रुपयांचा निधी उभा राहणार असून, हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी उपयोगात येईल, असा विश्वास ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.४) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याविषयी माहिती दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकासनीचा अहवाल शासनाला सादर करण्यासाठी ग्रामसेवकांनी नेमून दिलेल्या गावातील नुकसानग्रस्त पीक पंचनामे दि.१ नोव्हेंबरपासून सुरू केले असून, गावागावातील नुकसानीचा अहवाल ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे, सरचिटणीस रवींद्र शेलार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांना सादर केला. तसेच नुकसानग्रस्त शेतकºयांच्या आर्थिक मदतीसाठी ग्रामसेवक संघटनेतर्फे ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्ष सचिव यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. त्यानुसार गावपातळीवर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करताना झालेले नुकसान, शेतकऱ्यांची अगतिकता सभादांनी प्रत्यक्ष पाहिलेली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून ग्रामसेवकांनी एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून, नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकातून ही एक दिवसाच्या वेतनाची रक्कम कपात करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कैलासचंद्र वाघचौरे यांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, अधिकारी रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदFarmerशेतकरी