शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

२५ श्रावणकुमारांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:54 IST

आपल्या आई-वडिलांचा उतारवयात आधार घेत त्यांची ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ सेवा करणाऱ्या जैन समाजातील २५ श्रावणकुमारांना ‘आदर्श पुत्र-पुत्रवधू’ पुरस्काराने प्रमोद मुनिजी म.सा., डॉ. समकितमुनीजी म.सा. यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ठळक मुद्देआनंद महिला परिषद : आदर्श पुत्र-पुत्रवधू पुरस्काराचे वितरण

नाशिक : आपल्या आई-वडिलांचा उतारवयात आधार घेत त्यांची ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ सेवा करणाऱ्या जैन समाजातील २५ श्रावणकुमारांना ‘आदर्श पुत्र-पुत्रवधू’ पुरस्काराने प्रमोद मुनिजी म.सा., डॉ. समकितमुनीजी म.सा. यांच्या हस्ते गौरविण्यात आले.जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ, नाशिक संचलित आनंद महिला मंडळाच्या वतीने आर. के. जैनस्थानकात रविवारी (दि.११) पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी मोहनलाल लोढा होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर श्री संघाचे संघपती राजमल भंडारी, उपसंघपती हरकचंद कांकरिया, शंकरलाल गांग, शांतीलाल चोरडिया, अ‍ॅड. विद्युलता तातेड आदी उपस्थित होते.दरम्यान, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या श्रवणकुमार चरित्र प्रवचनमालेचाही रविवारी समारोप करण्यात आला. यावेळी माता-पित्यांची सेवा यावर आधारित दोन लघुनाटिकांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष सिंपल कांकरिया यांनी केले. सूत्रसंचालन प्रीती जैन, डॉ. सुषमा दुगड यांनी केले. आभार परिषदेच्या सचिव मंगला रायसोनी यांनी मानले.गुरूमहाराज समकितमुनिजी यांनी परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले. समाजाला अशा उपक्रमांची आज गरज आहे. माता-पित्यांची सेवा ईश्वरसेवा मानली गेली असून, आजच्या कलियुगात वृद्धाश्रमाची वाढती संख्या चिंताजनक बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पुरस्कार वितरण सोहळे नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम