शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटींची मेड इन इंडिया ह्यमोबाइल लॅबह्ण ठरणार रुग्णांसाठी वरदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 01:25 IST

नाशिक : कोणत्याही साथ-आजारांचा फैलाव रोखण्यासाठी साथग्रस्त भागात जाऊन साथीचे निदान करू शकणाऱ्या ह्यबीएसएल ३ह्ण या भारतच नव्हे तर चीनसह दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या पहिल्या लॅबचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नाशिकला लोकार्पण करण्यात आले.

नाशिक : कोणत्याही साथ-आजारांचा फैलाव रोखण्यासाठी साथग्रस्त भागात जाऊन साथीचे निदान करू शकणाऱ्या ह्यबीएसएल ३ह्ण या भारतच नव्हे तर चीनसह दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या पहिल्या लॅबचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नाशिकला लोकार्पण करण्यात आले. सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून संपूर्णपणे ह्यमेड इन इंडियाह्ण स्वरुपातील ही मोबाईल लॅब आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे केंद्रीय सचिव डॉ. बलराम भार्गव आदी उपस्थित होते.मोबाईल लॅबमुळे महाराष्ट्रात साथीचा उद्रेक झालेल्या ठिकाणी ही मोबाईल लॅब पोहोचून अत्यल्प वेळेत तपासणी होऊन साथीबाबत निष्कर्ष काढता येईल. त्यामुळे रोगाचा प्रसार कमी कालावधीत रोखणे शक्य होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. भविष्यात विषाणूंचा प्रसार पक्षी, प्राणी, धान्य, हवा तसेच शत्रू राष्ट्रांकडूनही होण्याचा धोका असल्याने मोबाईल लॅबची पूर्तता झाल्याचा आनंद आहे. कोणत्याही पेचप्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी ही शांततेच्या काळातच करायची असते, असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले. दक्षिण आशियातील सर्वात मोठी प्रयोगशाळाया प्रयोगशाळेतून कोविडसारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणाऱ्या संभाव्य प्राणघातक आजारांचे निदान होऊ शकणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरणे आहेत. नमुन्यांचा लॅबबाहेर तसेच लॅबमध्ये कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञांनाही कोणताही धोका होऊ शकणार नाही. कालापव्यय टळणारदेशपातळीवर चार विभागांमध्ये चार याप्रमाणे तयार करण्यात येत असलेल्या कन्टेनमेंट प्रयोगशाळेतील ही पहिली मोबाईल लॅब आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारताच्या कोणत्याही भागात एखाद्या साथीचा, रोगाचा किंवा दुर्मीळ आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यास तेथे रुग्णांच्या नमुन्यांची जागेवरच तपासणी करता येणार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक