नाशिक : महापालिकेने मार्चअखेर घरपट्टी वसुलीच्या माध्यमातून ११५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत ६८ कोटी ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे. दरम्यान, महापालिकेने २४२६ थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट बजावले असून, त्यातील १०४३ मिळकतधारकांनी लगेच भरणा केला असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.महापालिकेने उद्दिष्ट्यपूर्तीसाठी धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. घरपट्टीच्या माध्यमातून पालिकेला अद्याप उद्दिष्टानुसार ४६ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. त्यानुसार महापालिकेने ७४ हजार ५८४ थकबाकीदार मिळकतधारकांना सूचनापत्र पाठविले असून, त्यातील २२ हजार ४०० मिळकतधारकांनी करभरणा केला आहे. याशिवाय महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, २४२६ मिळकतधारकांना जप्तीचे वॉरंट बजावले आहेत.
२४२६ थकबाकीदारांवर जप्ती वॉरंट
By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST