१६ लाख किंमतनाशिकरोड : नाशिकहून तामिळनाडूमध्ये मृत जनावरांची २४ हजार किलो कातडी घेऊन जाणारा ट्रक क्राइम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री दत्तमंदिर सिग्नल येथे पकडला. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये नाशिकच्या चार व्यापाऱ्यांचा समावेश आहे.नाशिकमधून तामिळनाडूकडे जाणाऱ्या एका ट्रकमधून मृत जनावरांची हजारो किलो कातडी विनापरवाना घेऊन जात असल्याची माहिती क्राइम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार क्राइम ब्रॅँच युनिट तीनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, आत्माराम रेवगडे, सुभाष गुंजाळ, जाकीर शेख, रवींद्र बागुल, संतोष कोरडे, बाळासाहेब दोंदे, राजेंद्र जाधव आदिंच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री दत्तमंदिर सिग्नल परिसरात सापळा रचला. यावेळी द्वारकाकडून सिन्नरच्या दिशेने जाणारा ट्रक (टीएन ५२ एफ १५०७) अडवला असता त्यामधून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी ट्रकचालकाला याबाबत विचारणा केली असता त्याने ट्रकमध्ये मृत बैल आणि म्हशीचे कातडे असल्याचे सांगितले. जनावरांच्या कातड्याचा वैद्यकीय प्रमाणपत्र व मृत जनावरांच्या कातडी वाहनाचा परवाना मागितला असता ते चालकाकडे नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर ट्रकचे सिन्नरफाटा मार्केट यार्डमधील वजन काट्यावर वजन केले असता ट्रकमध्ये बैल आणि म्हशीची कातडी असल्याचे उघडकीस आले.
२४ हजार किलो कातडी जप्त
By admin | Updated: October 16, 2015 23:50 IST