शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

२३२८ क्ंिवटल आवक, लिलाव सुरळीत सुरू

By admin | Updated: June 10, 2017 02:00 IST

राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आठव्या दिवशी मिटल्याने शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार पालेभाज्यांनी भरला होता

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : संपूर्ण कर्जमाफी तसेच विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आठव्या दिवशी मिटल्याने शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार पालेभाज्यांनी भरला होता. सकाळी दहा वाजेपर्यंत बाजार समितीत जवळपास २३२८ क्ंिवटल इतक्या शेतमालाची आवक आली होती. सायंकाळीही पालेभाज्यांचे लिलाव सुरळीत झाले.विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारपासून (दि. १) संप पुकारल्याने बाजार समितीतील दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. सलग आठवडाभर संप सुरूच असल्याने संपूर्ण शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झालेली होती. भाजीपाला उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना तिप्पट दराने भाजीपाला खरेदी करावा लागला. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बाजार समितीतील सर्वच घटकांवर परिणाम झाला होता. गुरुवारी सुकाणू कमिटीची बैठक झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणण्यास प्रारंभ केल्याने भल्या पहाटेपासूनच वर्दळ सुरू होती. बाजार समितीत फ्लॉवर, टमाटे, काकडी, भोपळा, गिलके, दोडके, वांगी, ढोबळी मिरची असा शेतमाल सकाळी मोठ्या प्रमाणात दाखल झालेला होता. दुपारपर्यंत जवळपास साडेतीन हजार क्ंिवटल शेतमालाची आवक आली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी दिली. बाजार समितीत दुपारी फळभाज्यांचा लिलाव झाल्यानंतर शेतकरी संपावर जाण्यापूर्वी जो बाजारभाव होता तसाच बाजारभाव शुक्रवारी झालेल्या लिलावात शेतकऱ्यांना मिळाला. ढोबळी मिरची २२० रुपये (१० किलो), कारले ३५० रुपये (१२ किलो), वांगे ४०० रुपये (१५ किलो), भोपळा २५० रुपये (१८ नग) असा बाजारभाव फळभाज्यांना मिळाला.