नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २०) एकूण २२३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १९२ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान नाशिक मनपा क्षेत्रात तिघांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०३५ वर पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार १८४ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १० हजार ८५५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १२९४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०८ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.६२, नाशिक ग्रामीण ९६.४७, मालेगाव शहरात ९३.४५, तर जिल्हाबाह्य ९४.७३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ७५ हजार १४८ असून, त्यातील ३ लाख ५८ हजार ९८२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १४ हजार १८४ रुग्ण बाधित आढळून आले असून, १९८२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात २२३ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:34 IST
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २०) एकूण २२३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १९२ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान नाशिक मनपा क्षेत्रात तिघांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०३५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात २२३ रुग्ण कोरोनामुक्त
ठळक मुद्दे१९८२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.