शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अ‍ॅँटिजेन चाचणीत २२१ व्यक्ती पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:57 IST

नाशिक : नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटरग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो नाशिक’ या एकात्मिक कृती योजनेच्या अँटिजेन चाचण्यांत सोमवारी २२१ व्यक्ती पॉझिटिीह आढळून आले. आजच्या २४ व्या दिवशी १२३९ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात, त्यापैकी २२१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. याची टक्केवारी १७.८३ आहे. मिशन अंतर्गत २४ दिवसात ३३७१० अँटिजेन चाचण्या होऊन ४१४६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांचे प्रमाण १२.३० टक्के आहे.

ठळक मुद्देमिशन झिरो अभियान : २४ दिवसात ३३७१० चाचण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटरग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो नाशिक’ या एकात्मिक कृती योजनेच्या अँटिजेन चाचण्यांत सोमवारी २२१ व्यक्ती पॉझिटिीह आढळून आले. आजच्या २४ व्या दिवशी १२३९ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात, त्यापैकी २२१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. याची टक्केवारी १७.८३ आहे. मिशन अंतर्गत २४ दिवसात ३३७१० अँटिजेन चाचण्या होऊन ४१४६ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांचे प्रमाण १२.३० टक्के आहे.मिशन झिरो नाशिक अंतर्गत लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेणे त्यांच्यावर औषधे व उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रु ग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करण्याचे काम केले जात आहे. यामुळे रु ग्ण लवकर बरे होऊन त्यांना शारीरिक व मानिसक बळ मिळत आहे.

त्याचप्रमाणे पुढील होणारे संक्रमणही थांबविण्यात मिशन झिरो अभियानाला यश आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून येतअसले तरी या मिशनमुळे कोरोनाला अटकाव केला जात आहे.प्लाझ्मा डोनर्स येत आहे पुढेप्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेंतर्गत कोरोनावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान देण्यासाठी पुढे येत असून, संमतीपत्रे भरून देत आहेत. कोरोनाविरु द्धच्या लढाईत यशस्वी झालेल्या १८ ते ५५ वयोगटातील व इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा इतर बाधित रु ग्णांना दिला जातो व त्यामुळे रु ग्णही कोरोनाविरु ध्दच्या लढाईत यशस्वी होत आहेत. प्लाझ्मादान संमतीपत्रे भरून देण्यासाठी ८६६९६६८८०७ या क्र मांकावर संपर्क साधण्याचे आवाहन या मिशनतर्फे करण्यात आले आहे.न घाबरता करा टेस्टनागरिकांनी न घाबरता रॅपिड अँटिजेन टेस्ट चाचण्या करून घ्याव्यात. तसेच आवश्यकेनुसार मोफत आरटी पीसीआर चाचणीकरिता समाज कल्याण वसतिगृह नासर्डी पुलाजवळ, नवीन बिटको रु ग्णालय नाशिकरोड, पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कंपाउंड येथे रु ग्णांनी संपर्क करावा व कोविडमुक्त नाशिकच्या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर भिकूबाई बागुल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गिते, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्पप्रमुख नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटरग्रेसचे चेतन बोरा यांनी केले आहे.२१ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनमहानगरपालिकेच्या सहा विभागांतील सर्व पक्षीय नगरसेवक, गणेश उत्सव मंडळे यांच्या सहकार्याने विविध परिसरातून २१ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन / गटांद्वारे तपासणी करत आहे. त्यात पॉझिटिव्ह रु ग्ण शोधून काढण्यात मदत होत आहे. मिशन झिरो नाशिककरिता २२५ च्या वर कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल