शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्याच्या लोकअदालतमध्ये २२०० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 17:37 IST

सटाणा : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत २२४४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून पक्षकार ,बँका ,ग्रामपंचायत यांच्या तडजोडीतून १ कोटी ४६ लाख ५८ हजार ४९१ रु पये वसूल करण्यात आले .

राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन येथील तालुका विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा न्या. संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .वेळ आणि पैसा वाचविण्याबरोबरच एकमेकामधील कटू टाळण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या खटल्यांमध्ये जास्तीत जास्त खटले तडजोडीने मिटविण्याचे आवाहन न्या. चव्हाण ,वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांनी केले होते .त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत न्यायालयात दाखल प्रकरणापैकी ९९ खटले तडजोडीने मिटविण्यात आले .यामध्ये अनेक जणांचे संसार जोडले गेले .तसेच धनादेश न वटता परत आलेल्या प्रकरणांमध्ये जे खटले दाखल झाले होते त्यामध्ये तडजोड होऊन त्या प्रकरणात ५८ लाख ७० हजार एवढी रक्कम भरून प्रकरणे मिटविण्यात आली. तसेच अनेक पोटगीचे खटले तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा अधिनियम सन २००५ मधील अनेक प्रकरणामध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली .राष्ट्रीय लोकअदालतच्या प्रचारासाठी न्यायालय व वकील संघाच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात ठिकठिकाणी कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जनजागृती होऊन लोकअदालतमध्ये चांगला प्रतिसाद मिळून खटले निकाली काढण्यास मदत मिळाली .यासाठी वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे ,चंद्रशेखर पवार ,अभिमन्यू पाटील ,नितीन चंद्रात्रे ,वसंतराव सोनवणे ,संजय सोनवणे ,रवींद्र पाटील ,रेखा शिंदे ,सुजाता पाठक ,यशवंत सोनवणे ,सोमदत्त मुंजवाडकर ,निलेश डांगरे ,प्रकाश गोसावी ,सतीश चिंधडे ,स्मिता चिंधडे ,मनीषा ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले .

टॅग्स :Lokadalatलोकअदालत