शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनासाठी २१ सदस्यीय सुकाणू समिती

By admin | Updated: June 6, 2017 03:03 IST

नाशिकच्या शेतकऱ्यांनी रविवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकरी संपात समन्वय राखण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणतांबे येथील शेतकऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक घेऊन शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत नाशिकच्या शेतकऱ्यांनी रविवारी राज्यस्तरीय बैठक घेऊन शेतकरी संपात समन्वय राखण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी झालेल्या राज्य भरातील आंदोलनाचा आढावा घेऊन मंगळवारी (दि.६) बैठक घेणार असून, शेतकरी संपाची पुढील दिशा ठरविण्याचे नियोजन करणार आहे. पुणतांबे येथील जयाजी सूर्यवंशी व धनंजय जाधव यांनी यांनी संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेतकरी संपात फूट पडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, शेतकरी संपात कोणतीही फूट पडली नसून राज्यातील शेतकरी अधिक आक्रमक होऊन संपात सहभागी झाला आहे. मात्र झालेल्या प्रकारामुळे कोणीही शेतकऱ्यांना आंधारात ठेवून अशा प्रकारे निर्णय घेऊन नये यासाठी नाशिकमधील बैठकीत सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संपाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समन्वयाचे काम करणार आहे. शेतीप्रश्नांना देशस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची ही नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये २१ जणांची नावे आहेत. सुकाणू समिती संदर्भात शेती अर्थतज्ज्ञ डॉ. गिरधर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे. राजकीय पक्षांना दूर केल्याने हिंसात्मक आंदोलन थांबले आणि अहिंसात्मक प्रभावी आंदोलन सुरू झाले आहे. राज्यभरातील नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन झाली असून, या समितीमध्ये अजूनही काही राज्यभरांतील सदस्यांची नावे वाढणार आहे. ही समिती शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.