शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

पहिल्याच दिवशी मंुबईला २१ सुवर्ण

By admin | Updated: May 30, 2014 01:04 IST

नाशिकच्या नचिकेतचा नवा विक्रम : राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेला प्रारंभ

नाशिकच्या नचिकेतचा नवा विक्रम : राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेला प्रारंभनाशिक : येथे आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर व सबज्युनिअर जलतरण स्पर्धेमध्ये नाशिकच्या नचिकेत बुझरूक याने ५० मीटर बटरफ्लायमध्ये ०.२७.८७ अशी राज्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवित नवा विक्रम स्थापित केला; तर मंुबईच्या जलतरणपटूंनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वर्चस्व राखत विविध गटांतून २१ सुवर्णपदके पटकावत पदतालिकेत अव्वल स्थान पटकावले. नाशिकरोडच्या राष्ट्रमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना, नाशिक जिल्हा हौशी जलतरण संघटना व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर व सबज्युनिअर जलतरण स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन महापौर ॲड. यतिन वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती रमेश धोंडगे, नाशिकरोड प्रभाग सभापती कोमल मेहरोलिया, नगरसेवक संगीता गायकवाड, ललिता भालेराव, संगीता दलवाणी, संभाजी मोरुस्कर, कन्हय्या साळवे, योगिता अहेर, अधीक्षक अभियंता यू. बी. पवार, देवंेद्र सिंग, राज्य संघटनेचे सचिव किशोर वैद्य आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आबा देशमुख यांनी केले. अविनाश खैरनार यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रानंतर जलतरण स्पर्धेला प्रारंभ झाला. ज्युनिअर व सबज्युनिअर गटातील विविध स्पर्धांतून मंुबईच्या जलतरणपटूंनी पहिल्याच दिवशी पदतालिकेत आघाडी घेत वर्चस्व राखले. मंुबईने २१ सुवर्णपदकांसह ५० पदके पटकावली, तर दुसर्‍या स्थानी असलेल्या पुणेने सहा सुवर्णपदकांसह २१ पदके मिळविली. नाशिकच्या खात्यावर एका सुवर्णपदकासह पाच पदके असून, चौथे स्थान आहे. सहा पदकांसह ठाणे तिसर्‍या स्थानी आहे. पदतालिकाजिल्हासुवर्णरौप्यकांस्यएकूणमंुबई२११५१४५०पुणे ६१०५२१ठाणे २२२६नाशिक११३५वॉटरपोलोत नाशिकची विजयी सलामीवॉटरपोलो प्रकारामध्ये नाशिकच्या संघाने विजयी सलामी दिली. नाशिकने जळगाव संघाला १६-० असे पराभूत केले. नाशिककडून अभिषेक कितुर (६), यश कांबळे (५), योगंेद्र देवरे (४) यांनी गोल केले. नचिकेतचा विक्रमनाशिकचा जलतरणपटू नचिकेत बुझरूक याने १४ वर्षांआतील मुलांच्या गटातील ५० मीटर बटरफ्लाय या क्रीडा प्रकारामध्ये ०.२७.८७ अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदविली. आत्तापर्यंतच्या राज्य जलतरण स्पर्धेतील ही वेळ सर्वोत्कृष्ट ठरल्याने नचिकेतच्या नावे सदरचा विक्रम नोंदविला गेला. स्पर्धेचा निकाल :२०० मी. फ्री स्टाईल (मुले) : इशान जाफर (मंुबई-सुवर्ण), वेदांत राव (मुंबई-रौप्य), निमेश मुळे (वर्धा-कांस्य).२०० मी. फ्री स्टाईल (मुली) : आयुषा बोरा (पुणे-सुवर्ण), माणिक चतुरमुथा (नाशिक-रौप्य), त्रिशा बीमाणी (मुंबई-कांस्य).२०० मी. फ्री स्टाईल (मुले) : आर्यन मखिजा (मंुबई-सुवर्ण), सुकृत कापसे (मंुबई-रौप्य), अनिकेत चव्हाण (कोल्हापूर-कांस्य)२०० मी. फ्री स्टाईल मुली : रयना सलदना (मंुबई-सुवर्ण), प्रोतिती सिन्हा (मंुबई-रौप्य), मल्लिका बैकेरीकर (मुंबई-कांस्य).२०० मी. फ्री स्टाईल मुले : यश पत्की (मुंबई-सुवर्ण), अवधूत परुळेकर (कोल्हापूर-रौप्य), अमिर असरीवाला (मुंबई-कांस्य).२०० मी. फ्री स्टाईल मुली : अनन्या मेहेरे (मुंबई-सुवर्ण), वेदिका मखिजा (मुंबई-रौप्य), अन्या त्यागी (ठाणे-कांस्य).४०० मी. वैयक्तिक मिडले मुले : इशान जाफर (मंुबई-सुवर्ण), पार्थ राणे (पुणे-रौप्य), जोसन स्मिथ (मंुबई-कांस्य).४०० मी. वैयक्तिक मिडले मुली : ज्योती पाटील (मुंबई-सुवर्ण), नूपुर कदम (ठाणे-रौप्य), सुब्या मुलानी (कोल्हापूर-कांस्य)४०० मी. वैयक्तिक मिडले मुले : आर्यन मखिजा (मंुबई-सुवर्ण), वेदांत पारकर (मुंबई-रौप्य), अथर्व फडके (ठाणे-कांस्य).४०० मी. वैयक्तिक मिडले मुली : प्रोतिती सिन्हा (मंुबई-सुवर्ण), मुस्कान तोलानी (मंुबई-रौप्य), रयना सालदना (मंुबई-कांस्य).२०० मी. बॅकस्ट्रोक मुले : नील गंुडे (पुणे-सुवर्ण), हर्षल वाकनारिया (पुणे-रौप्य), ऋषिकेश जांभळे (कोल्हापूर-कांस्य).