शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

पोषण आहाराचे रखडले २१ कोटींचे अनुदान

By admin | Updated: February 17, 2016 23:27 IST

बचतगटांची ‘उपासमार’ : चार महिन्यांपासून प्रतीक्षा

नाशिक : गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचे सुमारे २१ कोटींचे अनुदान रखडले असून, यासंदर्भात शासनाला चार वेळा स्मरण देऊनही अनुदान न आल्याने बचतगटांवर उपासमारीचे वेळ आली आहे.राज्य सरकारच्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रति विद्यार्थ्यांमागे ३ रुपये ६७ पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमागे ५ रुपये ४६ पैसे अनुदान दिले जाते. त्यात इंधन अधिकार व भाजीपाला तसेच शिजविण्यासाठीचे अनुदान असते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे ४ लाख ६४ हजार ३७३ विद्यार्थी असून, सहावी ते आठवीपर्यंतचे दोन लाख ६० हजार ३२६ विद्यार्थी आहेत. शालेय पोषण आहाराचे अनुदान तिमाही येत असते. यापूर्वी सप्टेंबर २०१५ मध्ये हे अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. मात्र त्यानंतर आॅक्टोबर ते डिसेंबर हे तिमाही शालेय पोषण (पान ७ वर)आहाराचे इंधन अधिभार व भाजीपाला अनुदान जवळपासन १७ कोटी ८१ लाख प्रलंबित आहेत. त्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ९ कोटी ७१ लाख ४२ हजार तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ८ कोटी १० लाखांचे इंधन अधिभार व भाजीपाला पोटीचे गेल्या चार महिन्यांचे अनुदान बाकी आहे. तसेच ९ हजार ६१३ मदतनीस व कार्यकर्त्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दरमहा देण्यात येणारे सुमारे २ कोटी ८८ लाखांचे अनुदान प्रलंबित आहे. येत्या मार्च अखेर हे शालेय पोषण आहाराचे अनुदान सरकारला द्यावेच लागणार आहे. तूर्तास चार महिन्यांपासून पदरमोड करून विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा घास भरविणाऱ्या महिला बचतगटांना मात्र चार महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)इन्फो..पाठपुरावा सुरूशालेय पोषण आहाराचे अनुदान तिमाही दिले जाते. सप्टेंबरपर्यंतचे अनुदान वितरित झाले आहे. मात्र आॅक्टोबर ते डिसेंबरपर्यंतचे तिमाही अनुदान आणि जानेवारी महिन्याचे अनुदान मिळून सुमारे २० ते २१ कोटींचे अनुदान शासन स्तरावरूनच प्रलंबित आहे. याबाबत शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. याबाबत शिक्षण संचालक कार्यालयास आतापर्यंत तीन ते चार स्मरणपत्रे दिलेली आहेत. लवकरात लवकर अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- प्रवीण अहिरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक