शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

२० रोजी जिल्हा बँक संचालकांचा फैसला

By admin | Updated: April 19, 2016 00:16 IST

विधान परिषदेत कायदा मंजुरी रखडली

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर शनिवारी (दि.१६) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. आता याबाबत अंतिम सुनावणी २० एप्रिलला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील, परवेज कोकणी आदि उपस्थित होते. जिल्हा बॅँकेच्या वतीने अ‍ॅड. ढाकीफाळकर व अ‍ॅड. ओतुरकर यांनी युक्तिवाद मांडताना संचालकांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा कायदा विधानसभेत मंजूर झालेला असला तरी प्रत्यक्षात तो विधान परिषदेत संमत झालेला नाही. त्यामुळे ही बाब न्यायालयाने लक्ष घालावे. त्यावर न्यायालयाने यावर अंतिम सुनावणी २० एप्रिल रोजी घेण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली. राज्य सरकारच्या नवीन कायद्यानुसार प्रशासकीय मंडळ लागू झालेल्या नागरी व जिल्हा बॅँकांतील संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीशांसमोर घेण्याची विनंती राज्य सरकारने केल्याने मुख्य न्यायाधीशांसमोर या याचिकेची सुनावणी घेण्यात येत आहे. आता या प्रकरणी बुधवारी (दि.२०) अंतिम सुनावणी होणार असल्याने जिल्हा बॅँकेच्या त्या अकरा संचालकांचे अंतिम सुनावणीकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)