शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडसाठी आणखी २० टॅँकर्स मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:08 IST

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे. दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देवागदर्डीत २ जूनला पोहोचणार पाणीनागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे.

नाशिक : मनमाड शहराचा पाणीपुरवठा गंभीर झाल्याने पाण्याचे पुढील नियोजन होईपर्यंत जिल्हा प्रशासनाने मनमाडसाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर केले आहेत. यामुळे मनमाडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटणार असला तरी वाघदर्डी धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी कायम आहे.दरम्यान, मनमाडसाठी वाढविण्यात आलेल्या २० टॅँकर्समुळे नांदगाव तालुक्यातील टॅँकर्सची संख्या ८९वर पोहोचली आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण संपूर्णपणे कोरडेठाक पडल्याने तेथील नागरिकांना २० दिवसाआड पाणी मिळत आहे. धरण कोरडे होईपर्यंत तेथील मुख्याधिकाऱ्यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याने नवनिर्वाचित खासदार भारती पवार यांनी मनमाडसाठी पाण्याचे नियोजन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार करंजवणमधून वाघदर्डीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु धरणात पाणी पोहोचण्यात लागणारा वेळ लक्षात घेऊन मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी तातडीने २० टॅँकर्स मंजूर करण्यात आले आहेत.जिल्ह्णात नांदगाव तालुक्यात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. जिल्ह्णात सर्वाधिक टॅँकर्स याच तालुक्यात सुरू असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. त्यातही मनमाडची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे मनमाडसाठी तातडीने नियोजन करण्याची मागणी खासदार भारती पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. त्यानुसार टॅँकर्स सुरू करण्यात येणार आहेत. वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे मनमाडकरांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वास्तविक धरण कोरडे झाल्यानंतर करंजवण धरणातून पालखेडमध्ये पाणी घेणे गरजेचे होते ते अगोदरच घेण्याचे नियोजन मुख्याधिकाºयांनी करून जिल्हा प्रशासनाला कळविणे अपेक्षित होते. मात्र त्याबाबत जिल्हा पातळीवर काहीही नियोजन नसल्याकडे खासदार भारती पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.येत्या २ जून रोजी करंजवणचे पाणी पालखेडमध्ये आणि तेथून ते वाघदर्डी धरणात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सुमारे ४९० एमसीएफटी पाणी वाघदर्डीत पोहोचणार आहे. त्यामुळे मनमाडकरांना काही प्रमाणात तरी पाणी उपलब्ध होणार आहे. तूर्तास मनमाडकरांची तहान भागविण्यासाठी २० टॅँकर्स लगेचच सुरू केले जाणार आहेत.