शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

२० लाखांचे स्पिरीट जप्त

By admin | Updated: May 20, 2017 00:46 IST

सटाणा/ताहाराबाद : गुजरातहून नांदेडकडे जाणाऱ्या मालट्रक मधून सुमारे वीस लाख रूपये किमतीचा आठ हजार लिटर स्पिरीट साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा/ताहाराबाद : गुजरातहून नांदेडकडे जाणाऱ्या मालट्रक मधून सुमारे वीस लाख रूपये किमतीचा आठ हजार लिटर स्पिरीट साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शुक्रवारी ताहाराबाद येथे ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.गुजरातकडून मोठ्याप्रमाणात अवैध स्पिरीटची (शुध्द मद्यार्क) वाहतूक केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बोगस विदेशी मद्य तयार करणारे रॅकेटचे गुजरातशी थेट कनेक्शन असून कसमादे पट्ट्यातही हे रॅकेट आता सक्रिय झाले आहे. बागलाण ,मालेगाव ,देवळा ,कळवण याभागात राजरोस हॉटेल व धाब्यांवर बनावट विदेशी मद्य विक्र ी केले जात आहे. या प्रकाराबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचे प्रमुख दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे , एन. आर. गुंजाळ यांना या अवैध स्पिरीट वाहतुकीची माहिती मिळाली होती. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या पथकाने ताहाराबाद येथील चौफुलीवर सापळा रचला होता.या सापळ्यात गुजरातहून येणारा मालट्रक क्र मांक (एमएच २६ एच ५९६८) पकडण्यात आला. या मालट्रक मध्ये निळ्या रंगाचे सुमारे बत्तीस बॅरेल आढळून आले. या बॅरेलमध्ये तब्बल आठ हजार लिटर स्पिरीट (शुध्द मध्यार्क ) आढळून आले. बाजार भावानुसार सुमारे वीस लाख रु पये किमतीचे हे स्पिरीट नांदेड येथे नेण्यात येत होते. ट्रक चालक संजय गलबाजी काळे (नांदेड ) याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. गेल्याच आठवड्यात मालेगाव येथील उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने मंगळूरफाटा ,उमराणे येथे अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणारे कंटेनर जप्त केले होते. तसेच वऱ्हाने शिवारात अवैधरीत्या वाहतूक करणारे स्पिरीटचे तीस बॅरल पकडले होते. त्यांच्या या कारवाईने मद्य सम्राटांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.