शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के थकीत वीजबिल भरल्यास सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:27 IST

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून असलेली कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. त्यानुसार एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास तत्काळ वीजपुरवठा सुरू होणार तसेच थकबाकीचे सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर  घेतलेल्या पहिल्याच जनता ...

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून असलेली कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. त्यानुसार एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास तत्काळ वीजपुरवठा सुरू होणार तसेच थकबाकीचे सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर  घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात त्यांनी ही माहिती दिली. राज्यात रब्बीसह अनेक प्रकारची पिके घेण्यासाठी विजेची गरज असून, सातत्याने वीज थकबाकी असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांची वीज जोडणी तोडण्यात येत असल्याने शेतकरी संकटात आल्याची तक्रार एका ग्रामस्थाने जनता दरबारात केल्यावर त्याबाबत गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. राज्यात जवळपास २० हजार कोटींहून अधिक वीज थकबाकी आहे.  राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही वीज थकबाकी वसूल होण्यासाठी विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे. ऐन हंगामात शेतकºयांची वीज जोडणी तोडण्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीज बिल असलेल्या शेतकºयांसाठी ही सवलत योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार ज्या शेतकºयाकडे सातत्याने वीज बिलाची थकबाकी असेल आणि त्याचे वीज कनेक्शन तोडले असेल, त्या शेतकºयाने एकूण वीज बिल थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. याबरोबरच त्या शेतकºयाच्या वीज बिलाचे दंड आणि व्याज माफ करण्यात येणार आहे. तसेच त्या शेतकºयाकडील एकूण थकबाकी चार किंवा पाच टप्प्यात भरण्यासाठी सवलत देण्यात येणार आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन मुख्यमंत्री लवकरच यासंदर्भात घोषणा करणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जनता दरबारात सांगितले.मलजलशुद्धीकरण केंद्रे बंधनकारकनगरपंचायती, नगरपालिका व महापालिका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी नद्या व धरणे यांच्यात थेट प्रक्रिया केल्याशिवाय सोडू नये, यासाठी मलजल श्ुद्धीकरण केंद्रा बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व नगरपालिका, महापालिका यांना पाणी नदीत सोडण्याआधी त्यांनी मलजलशुद्धीकरण (एसटीबी)केंद्र उभारण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे.मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना : ऊर्जामंत्री नागपूर : वीजबिलांची थकबाकी असलेल्या महाराष्ट्रातील कृषिपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना २०१७’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार शेतकºयांना पाच समान हप्त्यांत थकबाकीची मूळ रक्कम भरता येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.