शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्टेशन

By suyog.joshi | Updated: February 7, 2024 16:12 IST

मागील एक वर्षापासून रखडलेल्या ई-चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला लवकरच मुहूर्त लागणार असून, निविदा प्रक्रियेत दिल्ली येथील कंपनी त्यासाठी पात्र ठरली आहे. 

नाशिक (सुयोग जोशी) : केंद्र सरकारच्या 'एन कॅप' योजनेअंतर्गत (राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम) शहरात पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यासाठी साडेसात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मागील एक वर्षापासून रखडलेल्या ई-चार्जिंग स्टेशन उभारणी कामाला लवकरच मुहूर्त लागणार असून, निविदा प्रक्रियेत दिल्ली येथील कंपनी त्यासाठी पात्र ठरली आहे. 

केंद्र व राज्य शासन प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. अशा वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात आहे. नाशिक शहरातही इलेक्ट्रिक वाहनास पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता महापालिका 'एन कॅप' योजनेअंतर्गत शहरात पुढील काही वर्षांत १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार असून, पहिल्या टप्प्यात वीस स्टेशन उभारली जाणार आहेत. त्यासाठी मागील वर्षभरात मनपा विद्युत विभागाने तीनदा फेरनिविदा राबविल्या. 

त्यात टाटा, रिलायन्स यासारख्या दिग्गज कंपन्यांनी प्रतिसाद दिला; पण कागदपत्र पूर्तता व तांत्रिक तपासणीत निविदा अपात्र ठरल्या. तिसऱ्या फेरनिविदेत सहा कंपन्यांनी सहभाग दर्शवला. त्यानंतर तांत्रिक तपासणीत दिल्ली येथील कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीचे देशातील अनेक शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले आहे. आणखी काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर या कंपनीला हे काम दिले जाणार असून, लवकरच चार्जिग स्टेशन उभारण्यास सुरुवात होईल. त्यासाठी मनपा जागा उपलब्ध करून देणार आहे.

येथे होणार स्टेशन...राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान.

टॅग्स :Nashikनाशिक