शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांत उदासिनता : मास्क न वापरणाऱ्या २ हजार ६२७ लोकांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 21:34 IST

नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा अस आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत;

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन ७४ लोकांना भोवले

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र तरीदेखील काही नागरिक अत्यंत निष्काळजीपणे मास्क न वापरता वावरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने सर्वच पोलीस ठाण्यांकडून धडक कारवाई केली जात आहे. मास्कचा वापर केला नसल्याचे आढळून आलेल्या अद्याप २ हजार ६२७ लोकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हददीत लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घराबाहेर पडु नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा अस आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत; तरीदेखील मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संचारबंदी जमावबंदी आदेशाचे पालन न करणाºया ७४ लोकांवरही कारवाई करण्यात आली आहे. २२ मार्चपासून अद्यापपर्यंत भारतीय दंडविधान कलम १८८नुसार २ हजार ६२७ लोकांविरूध्द कारवाई केली गेली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आयुक्तालयाच्या सुत्रांनी दिली आहे. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करत उपाययोजना करणे अनिवार्य असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcorona virusकोरोना वायरस बातम्या