शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी राज्य शासनाकडून २ लाख २० हजार मेट्रीक टन खत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:52 IST

सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात  १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती.

नाशिक : सन २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला २ लाख ५८ हजार मेट्रिक टन रासायनीक खतांची मागणी करण्यात आली असून, शासनाने दोन लाख २० हजार २२० मेट्रिक टनास मंजुरी दिली असून, सध्या जिल्ह्यात  १ लाख २५ हजार ४१९ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने नियोजन केले असून, या वर्षी एकूण ६ लाख ६२ हजार १५४ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी गृहीत धरण्यात आले आहे. गतवर्षी ६ लाख ५१ हजार ९२८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली होती.  हंगामात शेतकरी मका  पिकाला प्राधान्य देत असल्याने, या पिकाच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. या वर्षी  २ लाख ४४ हजार ६२० हेक्टरवर मकाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी  २ लाख ३७ हजार ८२६ हेक्टरवर मकाची पेेरणी करण्यात आली होती. मका पाठोपाठ  सोयाबिनचाही चांगला पेरा होत असतो. या वर्षी ८८ हजार २१४ हेक्टरवर सोयाबिनचा पेरा होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबिनचे बियाने बोगस निघाल्यामुळे शेसकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. nगतवर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांचे बियाणे उतरलेच नसल्यामुळे त्यांचा पेरणीचा खर्च वाया गेला होता. त्यामुळे गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता, या वर्षी जिल्ह्यातील किती शेतकरी या हंगामात सोयाबिनची पेरणी करतील, याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. जिल्ह्यातील काही भागात कापसाचाही पेरा होत असून, या वर्षी ४२ हजार ५४० हेक्टर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. nजिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी नगदी पिकांना पसंती देत असल्यामुळे जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र कमी होत असून, गतवर्षी १९५९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. या वर्षी ज्वारीसाठी केवळ ८७२ हेक्टर क्षत्र गृहीत धरण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बळीराजावर चिंतेचे सावट कायम आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती