शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणसंस्थेच्या १८ जागांसाठी ३६ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:38 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, सरचिटणीस पदांसह १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ७) ११४ पैकी ७८ जणांनी माघार घेतल्याने संस्थापक व परिवर्तन पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे.

 

लोकशिक्षण मंडळ : परिवर्तन-संस्थापक पॅनलमध्ये लढत; प्रथमच निवडणूक होत असल्याने चुरस

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, सरचिटणीस पदांसह १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ७) ११४ पैकी ७८ जणांनी माघार घेतल्याने संस्थापक व परिवर्तन पॅनलमध्ये दुरंगी लढत होत आहे.अध्यक्षपदासह चार पदाधिकारी, तीन विश्वस्त व ११ संचालक अशा एकूण १८ जागांसाठी येत्या १८ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. संस्थेत एकूण १३६६ सभासद मतदारसंख्या आहे. संस्थेच्या व्ही.पी. नाईक हायस्कूल, नांदूरशिंगोटे व भोजापूर खोरे हायस्कूल, चास अशा दोन शाखा आहे. १८ जागांसाठी ११४ अर्ज दाखल झाले होते. त्यात ७८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३६ उमेदवार निवडणूक लढवत असल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपाद जोशी, सदस्य गोपाळ शेळके, जगन्नाथ खैरनार यांनी दिली.अध्यक्षपदासाठी जयसिंह सुदाम सांगळे व संदीप शिवाजी भाबड, उपाध्यक्ष पदासाठी बंडूनाना दामोधर भाबड व प्रशांत सुभाष सानप, सरचिटणीस पदासाठी कृष्णा विलास सानप व बी. टी. शेळके, सहचिटणीस पदासाठी संजय दगडू शेळके व पोपट दामोधर शेळके यांच्यात समोरासमोर लढत होत आहे, तर विश्वस्तपदाच्या तीन जागांसाठी ६ उमेदवारांमध्ये थेट सामना आहे. केरू रामजी भाबड, शिवाजी बबन दराडे, मारुती कारभारी दराडे यांच्यात सरळ लढत होत आहे.संचालकपदाच्या नांदूरशिंगोटे गटाच्या चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सुधाकर कारभारी शेळके, नागेश शिवनाथ शेळके, दत्तात्रय वेडू सानप, अरुण भाऊपाटील शेळके, सुनील काशीनाथ मुंढे, रंजना उत्तम इलग, नामदेव लक्ष्मण गर्जे, चंद्रकांत मारुती शेळके यांच्यात समोरासमोर सामना रंगणार आहे. संचालकपदाच्या चास गटाच्या चार जागांसाठी परशराम तुकाराम भाबड, तुकाराम महादू भाबड, दिलीप राधाकिसन खैरनार, चंद्रभान कारभारी दराडे, शरद एकनाथ दराडे, जगन्नाथ गंगाधर खैरनार, सुनील जगन्नाथ भाबड यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. लोकशिक्षण मंडळ ही शैक्षणिक संस्था स्थापन झाल्यानंतर गेल्या ५५ वर्षांच्या काळात प्रथमच निवडणूक प्रक्रिया राबविली जात असल्याने सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वीस वर्षांपूर्वी संस्थेत नांदूरशिंगोटे व भोजापूर परिसरातील आणि उर्वरित तालुक्यातून सभासद नोंदणी झाली होती. त्यानंतर प्रथमच सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.विरोधी गटांकडून परिवर्तन, तर सत्ताधारी गटाकडून संस्थापक पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथमच निवडणूक होत असल्यानेअध्यक्ष व सरचिटणीस पदासाठी मोठ्या प्रमाणात चुरस पहायला मिळणार आहे.